Ladki Bahin Yojana : नुसता फॉर्म भरून पैसे मिळणार नाही, 'या' गोष्टी खूप महत्वाच्या!

मुंबई तक

13 Sep 2024 (अपडेटेड: 13 Sep 2024, 04:54 PM)

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्ही अर्ज केला असेलच आणि तो मंजूर देखील झाला असेल. पण नुसता फॉर्म भरून तुमचे पैसे येणार आहेत का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. यामागचे कारण म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासोबत आणखीण अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. ज्या खूप महत्वाच्या आहेत.

ladki bahin yojana scheme if you do these mistake you loose mukhyamantri ladki bahin yojana scheme installment amount devendra fadnavis aditi tatkare ajit pawar eknath shinde

फॉर्म भरलात तरी पैसे येणार नाही

follow google news

बातम्या हायलाइट

point

फॉर्म भरलात तरी पैसे येणार नाही

point

या चुका आजच टाळा

point

या चुका आजच सुधारून घ्या

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्ही अर्ज केला असेलच आणि तो मंजूर देखील झाला असेल. पण नुसता फॉर्म भरून तुमचे पैसे येणार आहेत का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. यामागचे कारण म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासोबत आणखीण अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. ज्या खूप महत्वाच्या आहेत. त्या केल्यानेच तुमच्या बँकेत (Bank Account) पैसे येणार आहेत? या गोष्टी नेमक्या काय आहेत? हे जाणून घेऊयात.  (ladki bahin yojana scheme if you do these mistake you loose mukhyamantri ladki bahin yojana scheme installment amount devendra fadnavis aditi tatkare ajit pawar eknath shinde)

हे वाचलं का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्यावेळेस आपण अर्ज करतो, त्यावेळेस अर्जात आधार कार्डशी संबंधित माहिती अर्जात भरतोय. यासोबतच बँक तपशील देखील देतो. या सगळ्या गोष्टी भरत असताना अर्जाच्या व्यतिरीक्त काही गोष्टी आपल्याला आणखीण कराव्या लागतात. त्या गोष्टी म्हणजे, तुमच्या आधारकार्डशी मोबईल नंबर जोडलेला असणे. तसेच तुमच्या आधारकार्डशी तुमचं चालू अकाऊंट जोडलेले असणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्ही अर्जात भरलेले बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसेच येणार नाहीयेत. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो...'या' दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा?

सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधारशी जोडून घ्या. काही दिवसातच बँका तुमचं अकाऊंट आधारशी लिंक करून देतात. तसेच तुमचे जूने अकाऊंट लिंक असेल तर ते देखील काढून त्याजागी नवीन अकाऊंट अॅड करता येणार आहे. ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

बँक अकाऊंट सोबत तुमचा मोबाईल नंबरही झटक्यात आधारशी लिंक करता येतो. कोणत्याही आधार सेंटवर गेल्यावर तुमचा नंबर आधारशी लिंक होणार आहे. फक्त लिंक होण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे ही दोन काम तुमची झाली की तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पैसे जमा व्हायला जास्त वेळ लागणार नाही. 

अर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण 1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये सांगितले होते. 

हे ही वाचा : Gold Price Today : बाईईई...झालं की सोनं स्वस्त! आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव काय? 

अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करणार

आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते.  एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं.  संबंधित व्यक्तीनं  पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. 

    follow whatsapp