Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा झाले आहेत. यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. मात्र काही महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य निघून गेले आहे. यामागचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसै तर महिलांच्या खात्यात जमा झाले पण ते अचानक गायब झाले होते. त्यामुळे या महिलांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता या महिलांसाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. (ladki bahin yojana scheme these women big blow installment amount 3000 deduct from account mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde)
ADVERTISEMENT
ज्या महिलांनी 31 जुलैआधी लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केले होते. त्या महिलांच्या खात्यात 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान 3000 जमा झाले होते. त्यामुळे रक्षाबंधनाला महिलांना सरकारकडून ओवाळणी मिळाली होती. मात्र ही ओवाळणी अचानक बँकेने काढून घेतली होती. त्यामुळे अनेक महिलांना याचा धक्का बसला होता.
हे ही वाचा : Maharashtra Bandh : "नराधमाला पाठिशी घालणारं विकृत सरकार..."; भर पावसात उद्धव ठाकरे संतापले
त्याचं झालं असं की अनेक महिलांनी खात्यात बँलेन्स मेनटेन न केल्याने त्यांच्यावर इंटरेस्ट लागला होता. आणि सरकारकडून जसे पैसे खात्यात टाकले गेले तसा ती रक्कम इंटरेस्टच्या रूपात वजा करण्यात आली होती. त्यामुळे महिलांना योजनेचे पैसे येऊन देखील महिलांचे खाते रिकामे राहिले होते.याचा महिलांना मोठा झटका बसला होता.
अनेक महिलांनी अशाप्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आता सरकारने यावर मोठा निर्णय़ घेतला आहे. या निर्णयाने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये सूचना महिला व बालविकास विभागाने बँकांना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.
लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही, कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असेही निर्देश बँकांना दिले आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
हे ही वाचा :भाजप आमदाराच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक, एका व्यक्तीचा जागीच मृत्यू
सरकारने घेतलेल्या या निर्णयाने महिलांच्या खात्यात आता पुन्हा 3000 जमा होणार आहेत. या निर्णयाने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ADVERTISEMENT