Ladki Bahin Yojana : बँकेत 4500 जमा झालेच नाही, 'या' यादीत तुमचं नाव तपासा

मुंबई तक

03 Oct 2024 (अपडेटेड: 03 Oct 2024, 06:35 PM)

Ladki Bahin Yojana : काही महिलाच्या खात्यात 4500 तर काहींच्या खात्यात 1500 जमा झाले आहे. पण तुमच्या खात्यात यापैकी एकही रक्कम आली नाही आहे. जर तुमच्या बाबतीत ही घटना घडली असेल तर आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत. या पर्यायाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं नाव यादीत तपासता येणार आहे.

ladki bahin yojana scheme third installement 4500 amount not deposite bank account what should women can do mukhymantri ladki bahin yojana scheme

महिलांंच्या खात्यात योजनेचे पैसेच आले नाही

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिसरा हप्ता बँकेत जमाच झाला नाही

point

महिलांनी आता काय करावे

point

या यादीत तुमचं नाव आहे का?

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. तर उर्वरीत महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे. काही महिलाच्या खात्यात 4500 तर काहींच्या खात्यात 1500 जमा झाले आहे. पण तुमच्या खात्यात यापैकी एकही रक्कम आली नाही आहे. जर तुमच्या बाबतीत ही घटना घडली असेल तर आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत. या पर्यायाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं नाव यादीत तपासता येणार आहे. (ladki bahin yojana scheme third installement 4500 amount not deposite bank account what should women can do mukhymantri ladki bahin yojana scheme) 

हे वाचलं का?

 लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे. गुगलवर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर धुळे कॉर्पोरेशन टाकायचं आहे. धुळे कॉर्पोरेशन टाकल्यावर नवीन पेज उघडणार आहे. यामध्ये पहिलाच पर्याय माझी लाडकी बहीण-लाभार्थी यादी धुळे म्युनसिपल कॉर्पोरेशन असा येईल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेजवर यादी डाऊनलोड करण्याचा पर्याय येणार आहे. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला यादी डाऊनलोड करता येणार आहे.   

हे ही वाचा : हर्षवर्धन पाटलांच्या मुलीच्या Whatsapp DP मुळे भाजपमध्ये भूकंप, पाहा कोणता आहे फोटो?

ही यादीत डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमच्या अॅप्लिकेशन नंबर, नाव, मोबाईल नंबर आणि अॅर्जाची स्थिती सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या नाव किंवा अॅप्लिकेशन नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. 

अशाचप्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची यादी तपासता येणार आहे. एकतर ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगर पालिकेच्या वेबसाईटवर मिळेल किंवा ही यादी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे. जर तरीही यादी सापडली नाही तर तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीणसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना या यादीबद्दल किंवा पैशांबद्दल विचारणा करता येणार आहे. त्यामुळे अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर ही यादी नक्की तपासा.

चौथा हप्ता कधी मिळणार? 

ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत.त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे 10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे.  ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळाला नाही आहे. त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सूरूवात केली आहे. त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे. जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल, तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 खात्यात येणार आहेत. 

हे ही वाचा : Shiv Sena UBT: 'असुरांचा संहार कराया, मशाल हाती दे...', ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं गाणं ऐकलं का?

दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जूलै महिन्यापासून प्रति महिना 1500 रूपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे. कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करता येत आहे. 

    follow whatsapp