Ladki Bahin Yojana : तुमचा अर्ज रिजेक्ट झालाय, तरी 4500 खात्यात डिपॉझिट होणार?

मुंबई तक

25 Aug 2024 (अपडेटेड: 25 Aug 2024, 04:57 PM)

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे (Women Application) अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले आहे. आता तुमचा अर्ज रिजेक्ट (Application Reject) झाल्यावर नेमकं करायचं काय? पुन्हा अर्ज करायचं की आणखी काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

ladki bahin yojana scheme your application is rejected do this things to avail benefit installment amount 4500 deposite to your bank account mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde

अनेक महिलांचे (Women Application) अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

तुमचा अर्ज रिजेक्ट झालाय का?

point

अर्ज रिजेक्ट झाल्यावर काय करायचं?

point

तुमच्या खात्यात 4500 रूपये जमा होणार का?

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा तीन महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. आता या महिलांना सप्टेंबरमध्ये येणाऱ्या तिसऱ्या हप्त्याची उत्सुकता आहे. असे असतानाच अनेक महिलांचे (Women Application) अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले आहे. आता तुमचा अर्ज रिजेक्ट (Application Reject) झाल्यावर नेमकं करायचं काय? पुन्हा अर्ज करायचं की आणखी काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme your application is rejected do this things to avail benefit installment amount 4500 deposite to your bank account mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde)

हे वाचलं का?

तुम्ही अर्ज भरून झाल्यानंतर जसा तुम्हाला अर्ज सबमिट झाल्याचा मेसेज येतो, तसाच मेसेज तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर देखील येतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्याचा मेसेज आला असेल तर सर्वात प्रथम वेबसाईटवर जा. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज नेमका का रिजेक्ट झाला आहे. याचे कारण सांगितले जाईल. 

हे ही वाचा : Lakhapati Didi Yojana : महिलांनो 5 लाखांची मदत मिळणार, 'लखपती दीदी' योजना नेमकी काय?

जसे तुम्ही आधारकार्ड अपलोड केला नाहीत किंवा जन्म दाखला, रेशन कार्ड अपलोड केले नाहीत, तुमचा फोटो व्यवस्थित नाही आहे. तसेच तुम्ही पाठवलेली कागदपत्रे व्यवस्थित दिसत नाही, अशी अनेक कारणे तुम्हाला दिली जातात. या कारणानंतर तुम्हाला पुन्हा कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय दिला जातो. त्यामुळे त्या पर्यायावरून पुन्हा कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज हा मंजूर होऊ शकतो. 

दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. 31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 42 हजार 823 अर्जाची पडताळणी सुरु आहे.

    follow whatsapp