Morning Walk: मॉर्निंग वॉक करताय? 'या 4 गोष्टी लक्षातच ठेवा', तरच आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे

मुंबई तक

11 Nov 2024 (अपडेटेड: 11 Nov 2024, 04:52 PM)

Right Way To Do Morning Walk : सकाळी चालल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळतात. चालल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होते. दररोज मॉर्निंग वॉक केल्याने तुमच्या मांसपेशी आणि हाडे मजबूत होतात.

How To Do Perfect Morning Walk

Morning Walk Rules

follow google news

बातम्या हायलाइट

point

सकाळी चालताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?

point

चालण्याने आरोग्यास कोणते फायदे मिळतात?

point

सकाळी चालताना या चुका टाळा

Right Way To Do Morning Walk : सकाळी चालल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळतात. चालल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होते. दररोज मॉर्निंग वॉक केल्याने तुमच्या मांसपेशी आणि हाडे मजबूत होतात. तसच शरीरातील रक्तस्त्रावही चांगला होतो. जर तुम्ही मॉर्निंग वॉक चांगल्या पद्धतीने केलं, तरच तुम्हाला याचे फायदे मिळतात. जेव्हाही तुम्ही मॉर्निंग वॉकला जाल, त्यावेळी खाली सांगितलेल्या चुका अजिबात करू नका. 

हे वाचलं का?

मॉर्निंग वॉक करताना 'या' चुका करू नका

1)  चालत असताना शरीर खालच्या बाजूने वाकवू नका. यामुळे शरीराचं संतुलन बिघडतं. चालत असताना काही लोक हातांना स्विंग करत नाहीत. पण चालताना हात स्विंग करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. यामुळे चालण्याची क्षमता सुधारते आणि शरीराचं संतुलन चांगलं राहतं. 

2) जर तुम्ही मॉर्निंग वॉकला जात असाल, तर जास्त पाणी पिऊ नका. तसच वॉक करताना योग्य शूजचा वापर करा. कारण चुकीच्या साईजचे शूज घातल्याने पायांना वेदना होऊ शकतात.

हे ही वाचा >>  Shahaji Bapu Patil: '...म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना सहन करतोय', शहाजीबापूंचं मोठं विधान!

3) काही लोक चालताना खालच्या बाजूला पाहतात किंवा मोबाईलवर काम करतात. त्यामुळे चालण्याची क्षमता कमी होते. म्हणजेच चालताना हाय इटेंन्सिटी नसेल, तर मोठ्या प्रमाणावर कॅलरीज बर्न होत नाहीत.

4) सकाळी कमीत कमी 3 ते 5 किलोमीटर चालल्याने आरोग्य निरोगी राहतं. मॉर्निंग वॉक केल्यानं मेटाबॉलिझम वाढतं. रिपोर्ट्सनुसार, सकाळी व्यायाम करणं आरोग्यास खूप फायदेशीर नसतं. कारण यावेळी मांसपेशी थंड असतात आणि शरीराचं तापमानही कमी असतं. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: '...तरच लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये'; अमित शाह नेमकं काय म्हणाले?

सकाळी कमीत कमी 3 ते 5 किलोमीटर चालल्याने आरोग्य निरोगी राहतं. मॉर्निंग वॉक केल्यानं मेटाबॉलिझम वाढतं. रिपोर्ट्सनुसार, सकाळी व्यायाम करणं आरोग्यास खूप फायदेशीर नसतं. कारण यावेळी मांसपेशी थंड असतात आणि शरीराचं तापमानही कमी असतं. मॉर्निंग वॉक केल्यानं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. सकाळी नाश्ता करण्याआधी चालल्यावर मांसपेशी मजबूत होतात आणि मेटाबॉलिझम वाढण्यासही मदत होते. 

    follow whatsapp