Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत संपणार आहे का? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. कारण राज्य सरकारने 31 ऑगस्ट ही अर्जाची अंतिम मुदत सांगितली होती. मात्र त्यानंतर मुदतीत वाढ केल्याचे देखील सांगितले होते. त्यामुळे खरंच 31 ऑगस्टची मुदत संपणार आहे का? आणि अर्जाची (Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme) शेवटची तारीख काय असणार आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana what was the last date of application for mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde)
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरूवातीला सरकारने 31 जुलैची मुदत दिली होती. मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेच अर्ज करण्याची मूदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. त्यानंतर ऑगस्टच्या मध्यंतरी देखील अर्जात मुदतवाढ दिल्याची बातमी समोर आली होती. पण नेमकी तारीख सांगण्यात आली नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यात आता 31 ऑगस्ट उद्यावर आल्याने महिलांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे नेमकी शेवटची तारीख काय आहे? असा प्रश्न महिलांना पडला आहे.
हे ही वाचा : PM Modi: 'मी नतमस्तक होऊन माफी मागतो', शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी PM मोदींचा माफीनामा
अर्जाची अंतिम तारीख काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आली नाही. तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अर्ज पडताळणीला सुरुवात
तसेच 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँककडे पाठवली जाणार आहेत.ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सूरू असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी एक्सवर दिली होती.
हे ही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवण पुतळा दुर्घटनेत पहिला आरोपी गजाआड, चौकशीतून नवीन माहिती समोर येणार?
त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्धपातळीवर सूरू झाली आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का? याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
'या' तारखेला पैसे खात्यात येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत. त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT