Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई तक

• 02:47 PM • 01 Sep 2024

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम शनिवारी नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर पार पडला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होती. या कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे.

ladki bahin yojana women get benefit of scheme mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar devendra fadnavis

52 लाख महिलांना दुसऱ्या टप्प्यात मिळणार लाभ

follow google news

बातम्या हायलाइट

point

दुसऱ्या टप्प्यात पैसे हस्तांतरणास सुरुवात

point

महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सूरूवात

point

अर्ज मंजूर झालेल्यांना मिळणार योजनेचा लाभ

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे पाठवायवा सुरूवात केली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला देखील सूरूवात झाली आहे. यासह आता लाडक्या बहीणींसाठी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. (ladki bahin yojana women get benefit of scheme mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar devendra fadnavis) 

हे वाचलं का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम शनिवारी नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर पार पडला होता.  या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होती. या कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

हे ही वाचा : Tanaji Sawant: अजित पवारांचं नाव घेताच तानाजी सावंतांना उलट्या का होतात? Inside स्टोरी

दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. त्या महिलांना पुन्हा सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे ज्या महिलांना अजूनही या योजनेचा लाभ घेता आला नाही आहे. त्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

52 लाख महिलांना मिळणार लाभ 

लाडकी बहीण योजनेत या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल 52 लाख महिलांच्या खात्यात (दि. 31) जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यासाठीचे एकूण 3 हजार रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

ज्या महिलांचे अर्ज हे ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात सरकारने पैसे पाठवायला सुरूवात केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या महिलांनी आताच खाते तपासायला सुरूवात करा. जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर ते येत्या दोन ते तीन दिवसात जमा होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Uddhav Thackeray : " मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी...", मविआच्या आंदोलनात उद्धव ठाकरे कडाडले

दरम्यान 17 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या निधी वितरणात  1 कोटी 7 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठवले होते. म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 59 लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये राज्य सरकारने टाकले आहेत. एखाद्या डेबीट योजनेतून 1 कोटी 59 लाख लाभार्थीना थेट लाभ त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातील सर्वात मोठी योजना असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. 

    follow whatsapp