How Start Use of Lipstick : लिपस्टीक (Lipstick) म्हणायला आधुनिक काळातील सौंदर्याचं प्रतिक मानलं जाऊ शकतं पण त्याचा इतिहास फार जुना आहे. ख्रिस्तपूर्व अडीच हजार वर्षांपूर्वी मेसोपोटेमियामध्ये एक राणी होती. जिचं नाव शुब-अद असं होतं. मृत्यूनंतर ज्यावेळी 20 व्या शतकात तिची कबर खोदण्यात आली त्यावेळी राणीसोबत काही मडकेही पुरल्याचे आढळून आले. ज्यामध्ये शिसे आणि लाल रंगाचे दगड पावडर स्वरूपात भरले होते. राणी हे मिश्रण ओठांवर लावायची. हा लिपस्टिकचा जुना प्रकार होता. त्यानंतर काय घडलं? लिपस्टीकची उत्क्रांती कशी घडली याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Lipstick is a Symbol of Beauty How Its History Began Know About It in Details)
ADVERTISEMENT
लिपस्टीकचा रोमांचक इतिहास!
लिपस्टीक ही महिलांच्या साज-शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हजारो वर्ष जुन्या संस्कृतीतही स्त्रिया ओठांवर रंग वापरत होत्या. इतिहासात असे अनेक पुरावे आहेत, जे सिद्ध करतात की, लिपस्टीक लावण्याची प्रथा पाच हजार वर्षे जुनी आहे. त्यावेळी फुले व मौल्यवान दगड बारीक करून त्याची पेस्ट लावली जात असे.
हजारो वर्षांपूर्वी मेकअप हा स्टेटस सिम्बॉल मानला जात होता आणि तो केवळ महिलांपुरता मर्यादित नव्हता. तर, या काळात पुरुषही स्त्रियांप्रमाणेच लिपस्टीकचा वापर करत असत. कारण यामुळे सौंदर्य तर वाढतच होतं पण हे एक औषध म्हणूनही काम करत होतं.
सुमेरियन सभ्यतेतील लोकांना लिपस्टीकच्या शोधाचं श्रेय दिलं जाऊ शकतं. त्याकाळात फळं, मेहंदी, माती आणि अगदी किडे-मुंग्या यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर ते बनवण्यासाठी केला जात असे. या बाबतीत मेसोपोटेमियन स्त्रिया काहीशा पुढे होत्या.
इजिप्शियन लोक कदाचित लिपस्टीकचे पहिले खरे प्रेमी होते. कारण त्यांनी लाल रंगाच्या पलीकडे जाऊन लिपस्टिकसाठी जांभळ्या, सोनेरी आणि काळ्या शेड्सचा शोध लावला. यासाठी त्यांनी मेंढ्यांचा घाम, मगरीची विष्ठा आणि अनेक कीटकांचा वापर केला. तसंच, इजिप्शियन लोकांनी शिसे आणि ब्रोमाइन, मॅनाइट आणि आयोडीन सारख्या हानिकारक पदार्थांचा देखील वापर केला, ज्यामुळे गंभीर आजार आणि त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकत होते.
जपानमध्येही स्त्रिया हेवी मेकअप वापरत असत, ज्यात गडद रंगाची लिपस्टीक होती, जी वायर आणि मेणापासून तयार केली जात असत. ग्रीक हे एक असे साम्राज्य होते जिथे लिपस्टीकचा वापर वेश्याव्यवसायाशी संबंधित होता आणि वेश्यांना कायदेशीररित्या त्यांचे ओठ रंगवणं आवश्यक होतं.
इ.स. 1865 मध्ये अबुल्कासिस या अरब शास्त्रज्ञाने सॉलिड लिपस्टीकचा शोध लावला. त्यांनी सुरुवातीला परफ्यूम लावण्यासाठी एक स्टॉक बनवला जो नंतर साच्यात बंद केला जाऊ लागला. त्यांनी हीच पद्धत लिपस्टीकच्या बाबतीतही वापरली आणि सॉलिड लिपस्टीकचा शोध लावला.
भारताबद्दल बोलायचं झाले तर, प्राचीन काळात ओठांना रंग देण्यासाठी सुपारीची पाने चघळली जात होती. याशिवाय, कोरडे आणि फुटलेल्या ओठांसाठी आयुर्वेदात रतनजोतची वाळलेली पाने तुपात मिसळून लावण्याचा सल्ला दिला जायचा. आजही अनेक भागात ओठांसाठी याचा वापर केला जातो.
मध्ययुगात कसा बदलला लिपस्टीकचा इतिहास?
जेव्हा ख्रिश्चन धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला तेव्हा चर्चने लिपस्टीक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मेकअपवर बंदी घातली. लाल ओठ सैतानाशी संबंधित आहेत आणि ज्या स्त्रिया लाल लिपस्टीक लावतात त्या चेटकीण असतात. असं ते मानू लागले. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांव्यतिरीक्त इतर कोणत्याही महिलांनी लिपस्टीक लावण्याचा अधिकार नव्हता. मात्र, त्यावेळी लिप बाम लोकप्रिय होते आणि अनेक स्त्रिया त्यात थोडासा रंग टाकून ते ओठांवर लावत असत.
16 व्या शतकात पुन्हा सुरू झाला लिपस्टीकचा वापर
राणी एलिझाबेथच्या कारकीर्दीत इंग्लंडमध्ये लिपस्टीकची पुन्हा वापसी झासी. राणीने स्वतः लिपस्टीक लावायला सुरूवात केली. गोरा रंग आणि त्यावर लाल ओठ यामुळे सौंदर्य आणखीनच खुलून दिसू लागलं. हे खूप लोकप्रिय झालं. परंतु, या काळात, लिपस्टीकचा वापर उच्च कुटुंबे किंवा अभिनेत्यांपर्यंत मर्यादित होता. यानंतर, जवळपास पुढील तीन शतके, लिपस्टीक फक्त अभिनेते आणि वेश्यांपर्यंत मर्यादित राहिली.
1930 हा काळ महामारीचा होता, परंतु त्याचा लिपस्टीकच्या उत्पादनावर परिणाम झाला नाही. या काळात केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, 50 टक्के तरूण मुली लिपस्टीक वापरण्यासाठी त्यांच्या पालकांशी भांडतात. यावेळी प्लम आणि बरगंडी हे लिपस्टिकचे लोकप्रिय रंग होते.
तसंच, 1940 चे दशक असताना दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकन सैन्यात सामील झालेल्या महिलांना लाल लिपस्टिक लावण्यास प्रोत्साहन देण्यात आले. त्याचे कारण म्हणजे ॲडॉल्फ हिटलर, ज्याला लाल लिपस्टीकचा तिरस्कार होता. भारताबद्दल बोलायचं झालं तर, या काळात अभिनेत्री मधुबाला याचे नियम तोडण्यासाठी ओळखली जात होती. या काळात महिला कलाकार बोल्ड मेकअप आणि पँट घालणे टाळत असत. पण मधुबालाने त्यावेळी बोल्ड मेकअप करत पँट-शर्ट घातले.
21 व्या शतकात लिपस्टीकमुळे कोणते झाले बदल?
2000 पासून, कदाचित लिपस्टिकशिवाय मेकअपची कल्पना करणंही कठीण झालं. या काळात भारतातील ब्रिटनी स्पीयर्स, पॅरिस हिल्टन आणि माधुरी दीक्षित या अभिनेत्रींनी शाइन आणि ग्लॉसी लिपस्टीक्सला प्रसिद्धीच्या झोतात आणले. आज लिपस्टीक काळाची गरज बनली आहे.
ADVERTISEMENT