Majhi ladki bahin yojana New Rules : रेशन कार्डवर नाव नाही, मग असा भरा अर्ज! 

मुंबई तक

• 12:59 PM • 13 Jul 2024

Majhi ladki bahin yojana important documents : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये आणखी सुस्पष्टता आणली असून, रेशन कार्डवर नाव नसलेल्या महिलांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?

माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या नियमामध्ये बदल.

follow google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेचे नवे नियम

point

रेशन कार्डवर नाव नसलेल्या महिलांनाही भरता येणार अर्ज

point

माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन शासन निर्णय काय?

Majhi ladki bahin yojana important information in marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत योजनेसाठी अर्ज भरण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने योजनेसाठी काही निकष निश्चित केले आहेत. आता या निकषांमध्ये आणखी बदल करण्यात आले असून, 12 जुलै २०२४ रोजी नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे ज्या महिलांचे रेशन कार्डवर नाव नाही, अशा महिलांनाही योजनेसाठी अर्ज भरता येणार आहे. (Eligible women who do not have name on the ration card can apply for the Mukhyamantri Majhi Ladki bahin Yojana)

हे वाचलं का?

मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना राज्यात लागू केली आहे. या योजनेतंर्गत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये, तर वर्षाला १८००० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana : रेशन कार्डवर नाव नसेल, तर कोणते कागदपत्र द्यावे लागणार?

महाराष्ट्र सरकारने अर्ज करणाऱ्या महिलांकडे उत्पन्न दाखला नसेल, तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरीही पात्र ठरवले जाणार, असे शासन निर्णयात म्हटले होते.

हेही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana Documents : 'ही' चार कागदपत्रे हवीच, नाहीतर अर्ज होईल बाद! 

त्यात आता आणखी सुधारणा करण्यात आली आहे. ज्या महिलांचे रेशन कार्डवर नाव नाही. त्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या महिलेच्या पतीचे रेशनकार्ड उत्पन्नाचा दाखल म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले अशी केली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> Mazi ladki bahin yojana : एक रुपयाही खर्च न करता घरीच भरा अर्ज! 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यातही सरकारने एक बदल केला असून, पोस्टातील बँक खातेही ग्राह्य धरले जाणार आहे. याचबरोबर इतरही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ते खाली दिलेल्या शासन निर्णयात वाचा...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महाराष्ट्र सरकारचा नवीन शासन निर्णय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन माहिती.

नारीशक्ती दूत अ‍ॅपवरून भरा अर्ज 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल. नारीशक्ती दूत असे या अ‍ॅपचे नाव आहे. 

अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर आधी तुमचा मोबाईल नंबर टाका. अटी आणि शर्थी या बटणवर क्लिक करा. त्यानंतर लॉगिन बटणावर क्लिक करा. 

आता चार अंकी ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल. तो टाका आणि व्हेरीफाय ओटीपी या बटणावर क्लिक करा.

हेही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana: ठरलं.. 1500 रुपये 'या' दिवशी जमा होणार तुमच्या बँकेत!

आता तुमचे प्रोफाईल भरा. म्हणजे तुमचे नाव, तुमचे गाव, जिल्हा आणि पत्ता. अशी सगळी विचारलेली माहिती भरा. नारीशक्ती या रकान्यात सामान्य महिला हा पर्याय निवडा.

अर्ज भरून झाला की महिलांच्या योजना यावर क्लिक करा. माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करा. 

आता तुमचा संपूर्ण अर्ज भरा. यात परत नाव, पतीचे नाव, जन्म तारीख, पत्ता अशी सगळी माहिती टाका. 

सगळी आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा. यात आधार कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तो नसेल तर रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आदी. आणि नंतर फॉर्म सबमिट करा.

    follow whatsapp