Mazi Ladki Bahin Yojana: Aaadhar Seeding हवंच नाहीतर 4500 रुपये...

मुंबई तक

20 Sep 2024 (अपडेटेड: 20 Sep 2024, 09:47 PM)

Mazi Ladki Bahin Yojana Seeding: माझी लाडकी बहीण योजनेसाठी आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. जाणून घ्या नेमकं कसं करायचं ते.

Mazi Ladki Bahin Yojana: Aaadhar Seeding हवंच नाहीतर 4500 रुपये...

Mazi Ladki Bahin Yojana: Aaadhar Seeding हवंच नाहीतर 4500 रुपये...

follow google news

बातम्या हायलाइट

point

आधार सीडिंग म्हणजे नेमकं काय

point

डी.बी.टी. इनेबल करणं आवश्यक

point

आधार कार्ड बँकेशी लिंक करावे लागेल

How to Mazi Ladki Bahin Yojana: Aaadhar Seeding: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत जवळजवळ 2 कोटींहून अधिक अर्ज आले आहेत, आतापर्यंत या योजनेअंतर्गत अनेक महिलांना 3000 रुपये देखील मिळाले आहेत. तर सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. त्यांना आता तब्बल 4500 रुपये मिळणार आहेत. आता लवकरच पात्र महिलांच्या  बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. पण असं असलं तरी ज्या महिलांच्या बँक खात्यात आधार सीडिंग असेल त्यांनाच हे पैसे मिळतील. अन्यथा त्यांना पैसे मिळणार नाही. 

हे वाचलं का?

आता आधार सीडिंग म्हणजे नेमकं काय? ते कसं अपडेट करावं त्यानंतर कोणती प्रक्रिया पार पाडावी असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतील. तर त्याच प्रश्नांची उत्तरं आम्ही आपल्याला देणार आहोत.

माझी लाडकी बहीण योजना आधार सीडिंग म्हणजे काय? (Mazi Ladki Bahin Yojana Aaadhar Seeding)

माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट पाठवल्यानंतरही अनेक भगिनी तक्रार करतात की लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेसा नाही, तर अशा लाभार्थ्यांना प्रथम त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक करावे लागेल, आणि डी.बी.टी. इनेबल करणं आवश्यक आहे. आधार सीडिंग आणि डीबीटी स्टेट्स हे नेमकं कसं तपासायचं हे आता आपण जाणून घेऊया.

माझी लाडकी बहीण योजना आधार सीडिंग कसे करावे? (How to get Mazi Ladki Bahin Yojana Aadhaar Seeding)

माझी लाडकी बहीण योजना आधार सीडिंग करण्यासाठी खाली दिलेल्या महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो करा?

  • सर्वप्रथम तुम्हाला npci.org.in वर जावे लागेल.
  • होम पेजवर consumer वर क्लिक करा. त्यानंतर त्याखाली भारत आधार सीडिंग एनेबलवर क्लिक करा
  • आता आधार क्रमांक टाका आणि येथे बँक आणि खाते क्रमांक योग्यरित्या निवडा.
  • बॉक्सवर क्लिक करा, कॅप्चा भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • आता तुमची विनंती सबमिट केली जाईल, त्यानंतर तुमचे आधार बँकेतून सीडिंग केले जाईल.

माझी लाडकी बहीण योजना DBT स्टेट्स कसं तपासायचं? (Mazi Ladki Bahin Yojana DBT Status Check)

माझी बहीण योजनेंतर्गत अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत नाहीत, यासाठी सर्वप्रथम तुमची DBT स्थिती तपासा. ज्याची प्रक्रिया खाली वर्णन केली आहे.

    follow whatsapp