Ladki Bahin Yojana : महिलांनो...तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का?

मुंबई तक

19 Sep 2024 (अपडेटेड: 19 Sep 2024, 05:03 PM)

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान हे पैसे खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांनी आजच आपले बँक खाते आणि मोबाईलमधील मेसेज तपासून घ्यावा.

ladki bahin yojana scheme third installment deposite on womens bank accountmukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar

तिसऱ्या हप्त्याचे पेसै आले

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिसऱ्या हप्त्यात पैसे जमा व्हायला सुरूवात

point

अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा

point

तुमच्या खात्यात पैसे आले का?

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान हे पैसे खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांनी आजच आपले बँक खाते आणि मोबाईलमधील मेसेज तपासून घ्यावा. जेणेकरून त्यांना त्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री पटेल. (ladki bahin yojana scheme third installment deposite on womens bank account mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar)  

हे वाचलं का?

लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते, त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांनी आपलं खाते तपासायला सुरुवात करा, 

दरम्यान अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500  जमा होतील? त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Aishwarya-Abhishek यांच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण...

आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3000 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत. 

मग 3500 कुणाला मिळणार? 

ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते. तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात हे 4500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रूपया आला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे. 

'त्या' महिलांना सप्टेंबरमध्ये मिळणार लाभ

ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिबीटी करणार आहोत,असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा : Gold Rate : बाईईई! आज सोनं स्वस्त झालं की महाग? 24 कॅरेटच्या किंमतीत मोठे बदल

'इतक्या' महिलांनी घेतला योजनेचा लाभ

''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला'', अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

''सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा'', असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

    follow whatsapp