Mazi Ladki bahin Yojana New GR : माझी लाडकी बहीण योजनेतील कोणत्या ‘या’ अटींमधून झाली सुटका?

मुंबई तक

21 Jul 2024 (अपडेटेड: 21 Jul 2024, 02:24 PM)

Mazi Ladki bahin Yojana Government GR : महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचे काही नियमांना पर्याय करून दिले आहेत. ते कोणते पाहा...

माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणते नियम बदलले?

follow google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेचे कोणते नियम बदलले?

point

महाराष्ट्र सरकारचा नवा शासन निर्णय काय आहे?

point

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार?

Ladki bahini yojana gr pdf : महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. १ जुलै २०२४ पासून ही योजना लागू करण्यात आली असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारने पात्रता आणि निकष ठरवले आहेत. त्यात काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. नवा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. (New GR of Majhi Ladki Bahin Yojana of Maharashtra Government)

हे वाचलं का?

माझी लाडकी बहीण योजना, पर्यायी कागदपत्रे

महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. त्यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे देणे अत्यावश्यक आहे. पण, कागदपत्रातील अडचणी लक्षात घेऊन सरकारने त्यात काही पर्यायी कागदपत्रे देण्याची मुभा दिली आहे. 

हेही वाचा >> चुका टाळा! 1500 रुपये मिळवण्यासाठी कसा भरायचा अर्ज? 

लाडकी बहीण योजनेचा नवीन शासन निर्णय वाचा

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुधारणांसंदर्भातील नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. संपूर्ण शासन निर्णय पहा...

माझी लाडकी बहीण योजना नवीन शासन निर्णय
माझी लाडकी बहीण योजनेत कोणत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत?
माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी किती दिवस शिल्लक?

राज्यातील महिलांसाठी आणण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली आहे. योजना जाहीर करताना योजनेचा अर्ज करण्यासाठी ३१ जुलै २०२४ ही तारीख ठरवण्यात आली होती.

हेही वाचा >>  'ही' चूक केली की 1500 रुपये विसरा.. थोडं सांभाळून! 

सरकारने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली. आता ३१ ऑगस्ट २०२४ रोजीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे योजनेचा अर्ज भरण्यासाठी ४० दिवस शिल्लक राहिले आहेत. 

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता कधी जमा होणार?

ज्या महिलांनी योजनेचा अर्ज भरला आहे. त्यांना आता बँक खात्यात पैसे कधी जमा होणार, याकडे लक्ष लागले आहे. सरकारकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. १९ ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये जमा केले जाणार आहेत. 

    follow whatsapp