Mazi Ladki Bahin Yojana Money: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेला सध्या राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महिलांना आर्थिक मदत म्हणून सरकार दरमहा 1500 देणार आहे. पण यासाठी काही नियम आणि अटी आहेत. तसेच हा योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख ही 31 ऑगस्ट आहे. पण त्याआधीच महिलांना पैसे त्यांच्या खात्यात मिळणार आहेत. (mazi ladki bahin yojana women will get rs 3000 before the last date how exactly)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिला प्रयत्नशील आहेत. अशावेळी त्यांना फारसा त्रास होऊ नये यासाठी सरकार देखील या योजनेची अत्यंत वेगवान पद्धतीने अंमलबजावणी करत आहे.
'या' दिवशी महिलांच्या खात्यात येणार पैसे!
त्यामुळे राज्य सरकारने या योजनेसंदर्भातील काही अटी आणि नियमांमध्ये बरीच शिथिलता आणली आहे. दरम्यान, आता या योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होणार आहेत. दरम्यान, जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून थेट 3000 रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत.
हे ही वाचा>> Ladka Bhau Yojana GR: लाडका भाऊ योजनेचा जीआर लागू, पाहा तरुणांना नेमके कसे मिळणार पैसे?
सदर योजनेत आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31. ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर कोणती कागदपत्रे आवश्यक?
या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे रहिवाशी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर इतर पर्याय देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT