Ladki Bahin Yojana : खुशखबर! लाडक्या बहिणींनो जानेवारीच्या 'या' तारखेला मिळणार 1500, आदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्षात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 की 2100 रुपयांचा हफ्ता कधी मिळणार? असा प्रश्न राज्यातील महिलांना गेल्या काही दिवसांपासून पडला होता.

 लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.

ladki bahin yojana scheme model code of conduct election commision of india maharashtra assembly election 2024 aditi tatkare

मुंबई तक

16 Jan 2025 (अपडेटेड: 16 Jan 2025, 09:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी

point

नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कधी मिळणार?

point

लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार? 1500 की 2100 ?

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्षात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 की 2100 रुपयांचा हफ्ता कधी मिळणार? असा प्रश्न राज्यातील महिलांना गेल्या काही दिवसांपासून पडला होता. अशातच आता लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हफ्त्याची तारीख राज्य मंत्रिमंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. नवीन वर्षात जानेवारी महिन्याचा हफ्ता साधारपणे 26 जानेवारीच्या आत वितरित केला जाईल, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसच महिलांच्या खात्यात पूर्वीप्रमाणेच 1500 रुपये जमा केले जाणार असल्याचंही तटकरेंनी जाहीर केलं.

हे वाचलं का?

आदिती तटकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत डिसेंबर महिन्याचा हफ्ता 25 ते 30 डिसेंबर या कालावधीत वितरीत केला होता. या महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला हफ्ता 26 जानेवारीच्या आत दिला जाणार आहे. त्या संदर्भातील आर्थिक नियोजन सुद्धा अर्थ विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याचा लाभ साधारपणे 26 जानेवारीच्या आत वितरित केला जाईल. तीन ते चार दिवसाच्या कालावधीत ज्या महिला लाभार्थी आहेत, त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल", अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा >> Kareena Kapoor Video : घाबरलेली करीना आली, सगळ्यात आधी कुणाशी बोलली, व्हिडीओमध्ये नेमकं काय?

विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना देण्याचा प्रयत्न आहे. साधारणपणे आम्हाला 3690 कोटी रुपयांची तरतूद अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे. या महिन्याचा लाभ त्यातून वितरित होणार आहे. या महिन्याचा लाभ त्यातून वितरित होणार आहे. फेब्रुवारी महिन्याची तयारीसुद्धा आम्ही करत आहोत. मार्च महिन्यात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या महिन्यातही कुठेही खंड पडता कामा नये, या पद्धतीने आम्ही उपाययोजना करत आहोत, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.

हे ही वाचा >> Dombivali : डोंबिवली हादरलं! ट्यूशनला घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी गजाआड

मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, लाडकी बहीण योजनेचा नवीन वर्षाचा पहिला हफ्ता 26 जानेवारीच्या आधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 1500 रुपये हफ्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास साडे तीन हजार कोटींची तरतूद जानेवारी महिन्यासाठी करण्यात आली. तसेच मागच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये 1 ते 2 टक्क्यांची घट होणार. कारण बऱ्याच महिलांनी एक पेक्षा अनेक योजनांचा लाभ घेतला. काहींचं डुप्लिकेशन झालं होतं. काहींनी स्वेच्छेने योजनेचा लाभ सोडला.

    follow whatsapp