Mukhyamantri Majhi Ladki Bahin yojana new website : राज्य सरकारने गुरुवारीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला होता. मात्र नारीशक्ती दुत अॅपवर अर्ज भरताना महिलांना अनेक तांत्रिक समस्या भेडसावत होत्या. या समस्या पाहता आता राज्य सरकारने महिलांसाठी नवीन वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईटवर महिलांचे अर्ज झटपट भरले जाणार आहेत. त्यामुळे या नवीव वेबसाईटवर अर्ज कसा भरायचा? हे जाणून घेऊयात. (mukhyamantri majhi ladki bahin yojana new website how to apply for scheme and how to fill application read full details)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने आता www. ladkibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाईटवर आता महिलांना अर्ज करता येणार आहे.विशेष म्हणजे ज्या महिलांनी नारीशक्ती अॅपवरून अर्ज भरले होते, त्यांनी या नवीन संकेतस्थळावर अर्ज करायचे नाहीयेत आहेत.
हे ही वाचा : Supreme Court : औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर होणार का...सुप्रीम कोर्टाने काय दिला निकाल?
कसा अर्ज भरायचा?
सरकारच्या या www. ladkibahin.maharashtra.gov.in वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आयडी पासवर्ड टाकायचे आहेत. जर तुमच्याकडे आयडी पासवर्ड नसतील तो तयार करण्यासाठी क्रिएट अकाऊंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आयडी पासवर्ड मिळणार आहेत. हे आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला पुढील प्रोसेस करता येणार आहे.
आयडी पासवर्ड भरल्यानंतर तुम्हाला लॉगिनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर लाडकी बहिण योजनेचा होमपेज उघडणार आहे. या होमपेजवर दुसरा पर्याय, अॅप्लिकेशन फॉर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल, तो तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार आहे. हा ओटीपी तुम्हाला भरायचा आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather: मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पाऊस; IMD चा सतर्कतेचा इशारा
ओटीपी भरल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा एक फॉर्म ओपन होणार आहे. या फॉर्ममध्ये आपल्याला अर्जदाराची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर खाली तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सगळी कागदपत्रे आणि फोटो अपलोड केल्यानंतर एक्सेप्ट डिस्क्लेमर/हमीपत्र यावर क्लिक करा आणि ते स्विकारा. त्यानंतर तुम्हाला सबमिटच्या बटणावर क्लिक करायचं आहे.
अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही भरलेला संपूर्ण फॉर्म तुम्हाला दाखवला जाईल. यावेळी तुम्हाला तुम्ही भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची पडताळणी करायची आहे. जर या भरलेल्या अर्जात काही चुक झाली असल्यास एडीट पर्यायावावर क्लिक करून तो एडीट करता येणार आहे. जर तुम्ही भरलेली माहिती बरोबर असेल तर कॅप्चा भरून तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. अशाप्रकारे आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
ADVERTISEMENT