NCERT Syllabus Change : एनसीईआरटीने सातवीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्लीतील सल्तनतचे सर्व संदर्भ काढून टाकले आहेत. तर भारतीय राजवंश, महाकुंभ, चारधाम आणि 'मेक इन इंडिया' आणि 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' सारख्या सरकारी उपक्रमांच्या नवीन प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहेत. या आठवड्यात प्रसिद्ध झालेली नवीन पाठ्यपुस्तके नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम (NCFSE) 2023 च्या अनुषंगाने तयार केली आहेत. यामध्ये शालेय शिक्षणात भारतीय परंपरा, तत्वज्ञान, ज्ञान प्रणाली आणि स्थानिक संदर्भांचा समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> "अक्षय शिंदेलाही पहलगाम मधल्या निरपराध भावांइतकंच...", किरण मानेंची काय म्हणाले, निशाणा कुणावर?
NCERT च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा पुस्तकांचा फक्त पहिला भाग आहे. दुसरा भाग येत्या काही महिन्यांत येण्याची अपेक्षा आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात वगळलेले भाग कायम ठेवले जातील की नाही याबद्दलची माहिती दिलेली नाही. एनसीईआरटीने यापूर्वी मुघल आणि दिल्ली सल्तनतवरील धडे लहान केले होते. तुघलक, खिलजी, मामलुक आणि लोदी यांसारख्या राजांचे तपशीलवार वर्णन आणि मुघल सम्राटांच्या इतिहासावरचा दोन पानांचा तक्ता समाविष्ट होता.
कोविड दरम्यान कमी केले होते काही भाग
दरम्यान, यापूर्वी एनसीईआरटीने 2022-23 मध्ये कोविड-19 महामारीदरम्यान अभ्यासक्रमाच्या तर्कसंगतीकरणाचा भाग काही बदल केले होते. याअंतर्गत मुघल आणि दिल्ली सल्तनत यांच्याशी संबंधित भाग कमी केले होते. यामध्ये तुघलक, खल्जी, ममलूक आणि लोदी यांसारख्या राजवंशांचा तपशीलवार वृत्तांत आणि मुघल सम्राटांच्या यशस्वी कामगिरीचा दोन पानांचा तक्ता समाविष्ट होता. आता नवीन पाठ्यपुस्तकातून यांचे सर्व संदर्भ पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत.
हे ही वाचा >> "तो टॅक्सी चालक अतिरेक्यासारखा वागत होता...", कुडाळच्या महिलेनं सांगितला धक्कादायक अनुभव
आता पुस्तकात सर्व नवीन प्रकरणं आहेत, ज्यामध्ये मुघल आणि दिल्ली सल्तनत यांचा कुठेही उल्लेख नाही. सामाजिक शास्त्राचे पाठ्यपुस्तक "एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड" मध्ये मगध, मौर्य, शुंग आणि सातवाहन यांसारख्या प्राचीन भारतीय राजवंशांवर नवीन प्रकरणे आहेत. ज्यामध्ये "भारतीय नीतिमूल्यां" वर विशेष भर देण्यात आला आहे.
प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्याचाही उल्लेख या पुस्तकात आढळतो. सुमारे 66 कोटी लोकांनी भाग घेतल्याचं म्हटलं आहे. मात्र, चेंगराचेंगरीत 30 यात्रेकरू मृत्युमुखी पडले आणि अनेक जखमी झाले याचा उल्लेख यात नाही. द इकॉनॉमिक टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
ADVERTISEMENT
