IRCTC Refund rules: देशाची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. रेल्वेमुळे कमी वेळात आपल्याला हवं ते ठिकाण गाठता येतं. परंतु कधीकधी ट्रेन उशिरा येते किंवा रद्द होते आणि यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. खरंतर, प्रवाशांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून भारतीय रेल्वेने अशा परिस्थितींसाठी परतफेडीचे म्हणजे रिफंडचे नियम बनवले आहेत. जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुम्हाला रिफंडच्या नियमांबद्दल माहिती हवी असेल तर ही बातमी नक्की वाचा.
ADVERTISEMENT
ट्रेन लेट झाल्यावर रिफंडचे नियम
जर तुमची ट्रेन उशिरा आली आणि अशावेळी तुम्हाला प्रवास करायचा नसेल, तर भारतीय रेल्वे तुम्हाला तुमच्या तिकिटाचे पूर्ण पैसे परत करू शकते. परंतु यासाठी काही अटी आहेत:
3 तासांपेक्षा जास्त उशीर
जर ट्रेन तिच्या नियोजित वेळेपेक्षा 3 तास किंवा त्याहून अधिक उशिरा आली तर तुम्ही तिकीट रद्द करू शकता आणि पूर्ण रिफंडाची मागणी करू शकता. हा नियम कन्फर्म तिकीट, RAC (Reservation Against Cancellation) आणि वेटिंग लिस्टमधील तिकिटांना लागू होतो. उदाहरणार्थ, जर तुमची ट्रेन सकाळी 10 वाजता आहे पण ती दुपारी 1 वाजता किंवा त्यानंतर पोहोचेल, तर तुम्ही रिफंड मागण्यास पात्र आहात.
कधी कॅन्सल करू शकता?
अशा परिस्थिती ट्रेन सुटण्यापूर्वी तिकीट रद्द करावे लागते. जर ट्रेन उशिरा आली तर तुम्हाला स्टेशनवर जाऊन किंवा ऑनलाइन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जर तुम्ही ट्रेन सुटल्यानंतर तिकीट रद्द केले तर तुम्हाला त्याचा परतावा मिळणार नाही.
तिकीट कॅन्सल झाल्यानंतर रिफंडचा नियम
जर रेल्वेद्वारे ट्रेन रद्दी केली गेली तर तुम्हाला पूर्ण रिफंड मिळतं आणि यासाठी जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागत नाही.
ऑटोमॅटिक रिफंड
जर ट्रेन पूर्णपणे रद्द झाली तर ऑनलाइन बुक केलेल्या ई-तिकिटाचा परतावा 3 ते 7 दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यात आपोआप जमा होतो. काउंटर तिकिटासाठी, तुम्हाला जवळच्या रेल्वे स्टेशनच्या आरक्षण काउंटरवर तिकीट जमा करावे लागेल. हे काम ट्रेन सुटण्याच्या नियोजित तारखेपासून 3 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा: Personal Finance: गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ कसा असावा? 'हा' 100 मायनस रूल ठरेल अचूक आणि फायदेशीर
तिकीट कॅन्सलेशनचं कोणतंच शुल्क नाही
ट्रेन रद्द झाल्यास कॅन्सलेशन शुल्क कापले जात नाही. तुम्हाला तुमच्या तिकिटाची पूर्ण रक्कम परत मिळेल. IRCTC द्वारे बुक केलेल्या तिकीटाचे पैसे ज्या खात्यातून तिकीटाचे पैसे भरले होते, त्याच खात्यात आपोआप जमा होतात.
खास बाबी
जर ट्रेनचा मार्ग बदलला, मध्येच रद्द झाला किंवा AC कोचमधील एसी काम करत नसेल, तरीही तुम्ही पूर्ण परतफेडची मागणी करू शकता. यासाठी तुम्हाला TDR ((Ticket Deposit Receipt) दाइल करावी लागेल.
तिकीट कॅन्सल केल्यानंतर किती पैसे कापतात?
जर प्रवाशाने स्वतःच्या इच्छेने तिकीट रद्द केले (ट्रेनला उशीर झाला नाही किंवा ती रद्द झाली नाही) तर रेल्वे काही शुल्क वजा करते.
- 48 तासांपूर्वी रद्द केल्यास - खूपच कमी वजावट (वर्गानुसार, सुमारे 60 रुपये ते 240 रुपये)
- 48 ते 12 तासांच्या दरम्यान - तिकिटाच्या 25 टक्के रक्कम कापली जाऊ शकते.
- 12 ते 4 तासांच्या दरम्यान - 50 टक्के पर्यंत कपात.
- जर 4 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असेल तर - सामान्यतः परतावा मिळत नाही (RAC/वेटिंग तिकिटाचे नियम वेगळे आहेत).
क्लासनुसार, शुल्क कपात
1. स्लीपर क्लास (SL)- 60 रुपये
2. एसी 3 टियर (3AC)- 180 रुपये
3. एसी 2 टियर (2AC)- 200 रुपये
4. एसी फर्स्ट क्लास (1AC)- 240 रुपये
हे ही वाचा: IRCTC Vikalp Option: आता तुमचं वेटिंग तिकीट होईल कन्फर्म; नक्की जाणून घ्या 'या' सोप्या स्टेप्स
तात्काळ तिकीटावर रिफंड कसं मिळेल?
जर तुम्ही तत्काळ तिकीट बुक केले असेल आणि तुमची ट्रेन रद्द झाली किंवा ट्रेन 3 तासांपेक्षा जास्त उशिराने आली तर तुम्हाला पूर्ण परतफेड मिळू शकते. या परिस्थितीत, जर तुम्ही प्रवास केला नाही आणि वेळेत TDR (तिकीट ठेव पावती) दाखल केली, तर रेल्वे तुमच्या तिकिटाची संपूर्ण रक्कम परत करेल. जर तुम्ही स्वतःहून तात्काळ तिकीट रद्द केले म्हणजेच ट्रेन उशिरा किंवा रद्द झाल्याशिवाय प्रवास न करण्याचा निर्णय घेतला तर तात्काळ शुल्क परत केले जाणार नाही. अशा परिस्थितीत, परतावा फक्त मूळ भाड्यानुसार दिला जातो, ज्यामध्ये तात्काळ शुल्क कापले जाते. म्हणून, ट्रेन रद्द झाल्यास किंवा ट्रेन 3 तासांपेक्षा जास्त उशिराने आल्यासच तात्काळ तिकिटाचे पूर्ण पैसे परत करता येतात.
ADVERTISEMENT
