Mazi ladki Bahin 3rd Installment List Out : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतीक्षा सर्वच महिलांना लागली आहे. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्ट 2024 ला रक्षाबंधनाच्या उत्सवादरम्यान देण्यात आला होता.
ADVERTISEMENT
त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हफ्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. आता या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तिसरा हफ्ता देण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची लिस्ट तयार करण्यात आली आहे. ज्या महिलांचा नाव या लिस्टमध्ये आहे, त्या सर्वांना तिसऱ्या हफ्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत. (All the women are waiting for the money of the third week of Chief Minister Majhi Ladki Bahine Yojana. A very important update has come out for those women who have applied for the scheme)
'त्या' महिला 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज भरू शकतात
माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे 15 सप्टेंबर 2024 पूर्वी जमा करण्यात येणार होते. परंतु, अजूनही लाखो महिला अशा आहेत, ज्यांनी नुकतच या योजनेसाठी अर्ज भरला आहे. आता त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहेत. त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही, त्या महिला 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज भरू शकतात.
हे ही वाचा >> Raj Thackeray : "तो सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही", लोकप्रिय अभिनेत्याला इशारा
लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. "दीड हजार ही छोटी रक्कम वाटत असली तरीही महिला भगिनींसाठी ती छोटी नाही. आमच्या सरकारने मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शंभर टक्के फी माफ केली, लेक लाडकी लखपती योजना सूरु केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीही लखपती दीदी, ड्रोन दीदी अशा योजना सुरू केल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींना लखपती झालेले आम्हाला पाहायचे आहे असे सांगितले.या योजनेवर तुम्ही विश्वास दाखवला असला तरीही काही जणांचा या योजनेवर संशय आहे. तुम्ही आम्हाला बळ दिलेत तर ही योजना दीड हजारावरून दोन हजार किंवा त्याहून जास्त वाढवू असे देखील सांगितले", असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवर म्हटलंय.
ADVERTISEMENT