Mukhyamantri Yojanadoot: 'लाडकी बहीण'नंतर 'यांना' मिळणार महिन्याला 10 हजार, नेमकी योजना काय?

मुंबई तक

14 Sep 2024 (अपडेटेड: 14 Sep 2024, 10:47 PM)

Mukhyamantri Yojanadoot News : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून 50,000 योजनादूत नियुक्ती केली जाणार असून त्याअंतर्गत प्रत्येक गावातून 1 व्यक्ती योजनादूत म्हणून निवडली जाणार आहे. त्यासाठी दूतांना दर महिन्याला 10 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

mukhyamantri yojana doot online apply last date extention yojana doot get 10 thousand rupees

महाराष्ट्र शासनाकडून 50,000 योजनादूत नियुक्ती केली जाणार आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमाला मुदतवाढ

point

50,000 योजनादूतांची नियुक्ती केली जाणार

point

या योजनादुतांना 10 हजार रूपये मिळणार

Mukhyamantri Yojanadoot News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री योजनादूत (Mukhyamantri Yojanadoot) हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी 10 हजार रूपये देण्यात येणार आहेत. हे फक्त 10 हजार योजनादुतांना मिळणार आहेत. या योजनेच अर्ज करण्याची मुदत आज संपणार होती. मात्र आज या योजनेला तीन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.  त्यामुळे योजनादुत होण्यासाठी नेमकं काय काय करायचं? या योजनेत नेमका अर्ज कसा करायचा?  कसे 10 हजार मिळणार आहेत? हे जाणून घेऊयात.  (mukhyamantri yojana doot online apply last date extention yojana doot get 10 thousand rupees) 

हे वाचलं का?

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून 50,000 योजनादूत नियुक्ती केली जाणार असून त्याअंतर्गत प्रत्येक गावातून 1 व्यक्ती योजनादूत म्हणून निवडली जाणार आहे. त्यासाठी दूतांना दर महिन्याला 10 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : उरले फक्त इतकेच दिवस, तिसरा हप्ता कधी येणार खात्यात?

योजना दूतांना काय काम करावे लागेल?

योजनादूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला घरोघरी जाऊन महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती पोहचविण्याचे काम करावे लागणार आहे. नियुक्ती कालावधी 6 महिने असून या कालावधीत तुम्हाला दरमहा 10 हजार रुपये मानधन मिळणार आहे. मानधनासोबत 6 महिने योजनादूत म्हणून काम केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. या प्रमाणपत्राचा फायदा तरूणांना भविष्यात होणार आहे. 

योजनेला मुदतवाढ 

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता 17 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे, आणखी 3 दिवस अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. 

हे ही वाचा : Video : 'नाही नाही' म्हणत राहिला, पण कुत्र्यांनी सोडलंच नाही...चिमुकल्याचे तोडले लचके!

योजनेच्या अटी काय? 

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा? 

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. दि. 17 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

    follow whatsapp