Optical Illusion: अस्वल शोधण्यात अनेकांना फुटला घाम! 20 सेकंदात शोधला तर...

मुंबई तक

05 Oct 2024 (अपडेटेड: 05 Oct 2024, 04:30 PM)

Optical Illusion Bear Photo : ऑप्टिकल इल्यूजनचे पझल्स इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांचा सुस्तावलेला मेंदू सक्रीय होतो. कारण ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंमध्ये काहीतरी भन्नाट असं दडलेलं असतं. म्हणजेच या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी वेळेत शोधणं, हे एक आव्हानच असतं.

Find The Hidden Bear In Optical illusion

Bear hides In The Forest

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा एव्हढा कठीण फोटो कधीच पाहिला नसेल

point

तुम्हाला 'या' फोटोत लपलेला अस्वल दिसला नसेल, तर क्लिक करून बघा

point

...तरच तुम्हाला फोटोत लपलेला अस्वल दिसेल

Optical Illusion Bear Photo : ऑप्टिकल इल्यूजनचे पझल्स इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांचा सुस्तावलेला मेंदू सक्रीय होतो. कारण ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंमध्ये काहीतरी भन्नाट असं दडलेलं असतं. म्हणजेच या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी वेळेत शोधणं, हे एक आव्हानच असतं. हे फोटो दिसायला स्पष्ट आणि सुंदर असतात. पण यामध्ये लपलेल्या काही गोष्टी शोधणं वाटतं तितकं सोपं नसतं. कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका जंगलाच्या फोटोमध्ये एक अस्वल लपलेला आहे. पण हा अस्वला शोधण्यात 99 टक्के लोकांना अपयश आलं आहे. पण हा अस्वल शोधण्यासाठी तुमच्याकडे 20 सेकंदाचा वेळ असणार आहे. (optical illusion puzzles went viral on the internet, many people brain became active . Because of optical illusion there is something strange and blurry in the photos)

हे वाचलं का?

तुम्हाला ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत एक घनदाट जंगल दिसत असेल. या जंगलात अनेक उंच झाडे आहेत. या झाडांमध्ये एक छोटसं घरसुद्धा आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जंगलात एक अस्वल सुद्धा लपलं आहे. हे अस्वल शोधण्यात अनेकांना घाम फुटला आहे. पण तुम्ही हा अस्वल 20 सेकंदाच्या आता शोधू शकता. फक्त तुम्हाला जंगलाचा हा फोटो तीक्ष्ण नजरेने पाहावा लागेल. 

हे ही वाचा >> Today Gold Rate: आता काय खरं नाय! नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही मुंबईसह 'या' शहरांमध्ये कडाडले सोन्याचे दर, कारण...

ज्या लोकांना जंगलात असलेला अस्वल शोधण्यात यश आलं आहे, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पण ज्यांना अजूनही अस्वल दिसला नाही, त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरुच ठेवायचे आहेत. तुम्हाला जंगलात अस्वल नक्कीच दिसेल, पण त्यासाठी तल्लख बुद्धीचा वापर करा. खूप प्रयत्न केल्यानंतरही ज्यांना अस्वल दिसला नसेल, त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कारण या जंगलात अस्वल नक्की कुठे लपला आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या घनदाट जंगलात झाडांच्या मध्ये एक घर आहे. पण त्या झाडांच्या फांद्यांचं तुम्ही नीट निरीक्षण केलं का? कारण याच फांद्यांमध्ये जो अस्वल लपला आहे, तो आम्ही तुम्हाला फोटोला सर्कल करून दाखवला आहे. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: '...तर लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट होईल', शिवसेनेच्या 'या' आमदाराचं मोठं विधान

सततच्या कामकाजामुळं वाढलेला तणाव कमी करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनसारखे फोटो फायदेशीर ठरतात. ऑप्टिकलच्या सर्वच फोटो खूप इंटरेस्टिंग असतात. कारण या फोटोंमध्ये बारीक सारीक गोष्टी लपलेल्या असतात. या गोष्टी शोधण्यासाठी अनेक जण बुद्धीचा वापर करतात, पण त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. कारण फोटोत असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी पाहण्यासाठी तीक्ष्ण नजर असणे आवश्यक असतं. 

    follow whatsapp