Bindeshwar Pathak Story : भारतात प्राचीन काळात मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगची प्रथा होती. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या हाताने मानवी मल स्वच्छ करायला लावायचे. हे काम जातिव्यवस्थेशी संबंधित होते, ज्यामध्ये तथाकथित कनिष्ठ जातींचे ते कार्य असल्याचे मानले जायचे. पण बिंदेश्वर पाठक हे ते व्यक्ती आहेत ज्यांनी लाखो लोकांना या प्रथेतून मुक्त केले. देशाला सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था दिली.
ADVERTISEMENT
अमेरिकेच्या विनंतीवरून, त्यांनी त्यांच्या सैन्याला विशेष शौचालये दिली. मंगळवार 15 ऑगस्ट 2023 रोजी बिंदेश्वर पाठक यांचे निधन झाले. सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते समाजसेवक बिंदेश्वर पाठक 80 वर्षांचे होते. सुलभ इंटरनॅशनलच्या कार्यालयात तिरंगा फडकवल्यानंतर त्यांना अस्वस्थ अस्वस्थ वाटू लागलं. प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्ली एम्समध्ये नेण्यात आले. जिथे त्यांनी दुपारी दोनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे.
Sharad Pawar : ‘सत्तेच्या मागे जा,पण माणुसकी…,’ शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं
बिंदेश्वर पाठक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि तमाम देशवासीयांनी दु:ख व्यक्त केले. पीएम मोदींनी ट्विट करून लिहिलं की, ‘बिंदेश्वर पाठक यांचे निधन हे देशाचे मोठे नुकसान आहे. स्वच्छ भारत घडवणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांची स्वच्छतेची आवड नेहमीच दिसून येत होती.’ याच बिंदेश्वर पाठकांबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात.
बिंदेश्वर पाठक कोण होते?
सफाई म्हणजे काय, नव्या पिढीने तुम्ही-आम्ही ऐकलंच असेल. बिंदेश्वर पाठक यांनी दोन वेळच्या भाकरीसाठी हे अत्यंत कष्टाचे काम करताना मोठ्या वर्गाला पाहिले होते. पण, काही लोकांना वाईट गोष्टी नुसत्या दिसत नाहीत, तर ते दूर करण्याचाही प्रयत्न करतात. बिंदेश्वर पाठकही तसेच. यासाठी ७० च्या दशकात बिंदेश्वर पाठक यांनी बिहारमध्ये सुलभ इंटरनॅशनलची पायाभरणी केली होती. सुलभ इंटरनॅशनल ही नॉन-प्रॉफिट संस्था आहे.
डॉ. बिंदेश्वर यांचा जन्म 1943 मध्ये बिहारच्या वैशाली जिल्ह्यात रामपूर बघेल गावात झाला. वडील रमाकांत पाठक हे सामाजिक प्रतिष्ठेचे व्यक्ती होते. हा तो काळ होता जेव्हा ग्रामीण भागात घरात शौचालय असणे हे अपवित्रतेचे प्रतीक मानले जात असे. पक्क्या घरांची संख्या खूपच कमी होती आणि त्यात शौचालयेही नव्हती.
बिंदेश्वर याबाबत किस्सा सांगताना म्हणाले होते की, ‘लहानपणी माझ्या मोठ्या घरात टॉयलेटशिवाय सर्व काही होतं. मी रोज पहाटे ४ वाजता घरातील महिला शौचासाठी बाहेर पडताना पाहायचो. ज्या घरांमध्ये स्वच्छतागृहे आहेत, त्या घरातील घाणही उचलावी लागत होती. कारण टाक्यांसह शौचालये नव्हती. हे काम तथाकथित अस्पृश्य वर्गाला करावे लागायचे.’
‘एक महिला बांबूपासून बनवलेल्या वस्तू विकण्यासाठी त्यांच्या घरी यायची असे. ती गेल्यावर बिंदेश्वरची आजी घरभर पाणी शिंपडायची. जेणेकरून घर शुद्ध होईल. पण बिंदेश्वर त्या स्त्रीला स्पर्श करून तिच्या शरीरात, रंगात काही बदल आहे की नाही हे पाहायचे. एकदा आजीने त्यांना असं करताना पाहिलं. घरात गोंधळ उडाला. बिंदेश्वर यांना शुद्धीकरणासाठी शेण खाऊ घालण्यात आलं, गोमूत्र पाजण्यात आलं. यावेळी बिंदेश्वर सात वर्षांचे होते.’
Mumbai : सेक्सला नकार… 18 वर्षीय मैत्रिणीचं भिंतीवर आपटलं डोकं, उशीने दाबलं तोंड
बिंदेश्वर यांचे बालपण सुखद नव्हते. ते १२ वर्षांचे असताना झाडावरून पडले. डावा हात कसा तरी वाचला. एक वर्ष झाले, काकांची हत्या झाली. एकत्र कुटुंब होते. आर्थिक परिस्थितीही बिघडली. शालेय शिक्षणानंतर बिंदेश्वर यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागले असते, पण गुण कमी आले. कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बिंदेश्वर यांनी एका ठिकाणी कारकून म्हणूनही काम केले. वय सुमारे 25 वर्षे होते. बिंदेश्वर यांचे आजोबा घरगुती उपचारांसाठी आयुर्वेदिक औषधे बनवत असत. बिंदेश्वर हे औषधे 10 किलोच्या बाटल्यांमध्ये भरून विकण्यासाठी निघत असे.
विचारांपासून ते शौचालयापर्यंत…
1968 मध्ये बिंदेश्वर यांनी कॉलेजमध्ये समाजशास्त्र आणि थोडेफार क्रिमिनोलॉजी (समाजशास्त्र आणि गुन्हेगारी) चे शिक्षण घेतले. या विषयांत मास्टर्स करून सीआयडी किंवा पोलिसात नोकरी करायची होती. हाजीपूर रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढले होते. मास्टर्ससाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेणार होते. मात्र ट्रेन पुढे जाण्यापूर्वीच बिंदेश्वर यांना त्यांचा चुलत भाऊ आणि मित्र भेटला. ते बिंदेश्वर यांना बिहार गांधी शताब्दी सेलिब्रेशन कमिटीमध्ये सेक्रेटरी म्हणून काम मिळवून देण्याबाबत बोलले आणि नकार देऊनही त्यांनी त्यांचं सामान ट्रेनमधून खाली उतरवलं.
या समितीत चार कक्ष होते. एकाचे मिशन होते हाताने सफाई करणाऱ्या कामगारांची ‘मुक्ती’. बिंदेश्वर यांना वेतनाची नोकरी तर मिळाली नाही. मात्र त्यांनी या समितीत अनुवादक म्हणून काम सुरू केले. पैसे न घेता काही दिवसांनी त्यांना त्याच ‘सेल’मध्ये पाठवण्यात आले. यावेळी त्यांना बेतिया येथे पाठवण्यात आले. येथे त्यांनी हाताने सफाई कामगारांच्या समस्या आणि उघड्यावर शौचाला बसण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम केले.
दरम्यान, 1969 मध्ये त्यांनी शौचालयासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले. जुन्या पद्धतींपेक्षा वेगळे. स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले हे नवीन पाऊल होते. या तंत्रांतर्गत बिंदेश्वर यांनी दोन खड्डे असलेलं शौचालय बांधलं. बिंदेश्वर म्हणाले होते की, ‘एका फ्लशमध्ये सुमारे एक ते दीड लिटर पाणी वापरले जात होते, तर सेप्टिक टँकमध्ये 10 लिटर पाणी लागते. याशिवाय या टाकीत गॅस पाइप नसल्याने मिथेन वायू बाहेर पडत नाही. आणि ही टाकी बनवणे देखील सोपे आहे.’
Sion Station : पत्नीला धक्का लागताच लगावली कानशिलात, प्रवाशाचा लोकलखाली चिरडून मृत्यू
1970 मध्ये बिंदेश्वर यांनी बिहारमध्ये सुलभ आंतरराष्ट्रीय सामाजिक सेवा संस्था सुरू केली. सुरुवातीला बिंदेश्वर यांच्या फ्लश टॉयलेट तंत्रज्ञानाला फारसे प्रोत्साहन मिळाले नाही. पण हळूहळू लोकांना फरक कळला आणि या तंत्रज्ञानाने विकसीत शौचालये मोठ्या प्रमाणात बनवली गेली. पाटणा महानगरपालिकेच्या मदतीने बिंदेश्वर यांनी देशातील पहिले पे-अँड-यूज सार्वजनिक शौचालय सुरू केले. पहिल्याच दिवशी पाचशे लोकांनी त्याचा वापर सुरू केला. त्याच्या देखभालीसाठी फक्त जनतेकडून पैसे गोळा केले जात होते. 1980 मध्ये त्यांनी मलमूत्रापासून बायोगॅस बनवण्याचा मार्गही सांगितला. हळूहळू, सुलभ शौचालये देशभरात स्वीकार्य बनली. देशातील जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लाखो सुलभ शौचालये कार्यरत आहेत.
अमेरिकेनेही मागितली होती मदत!
बिंदेश्वर यांच्या सुलभ इंटरनॅशनल संस्थेने अफगाणिस्तानमध्ये शौचालये बांधली. अमेरिकेनेही आपल्या सैनिकांसाठी शौचालये बनवण्याचा आग्रह धरला. 2016 मध्ये भारतीय रेल्वेने सुलभसोबत स्वच्छतेवर काम करण्यास सुरुवात केली. बिंदेश्वर यांची स्वच्छ रेल मिशनचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना पद्मभूषण व्यतिरिक्त अनेक पुरस्कार मिळाले. फ्रान्सचा लीजंड ऑफ प्लॅनेट पुरस्कार, दुबई आंतरराष्ट्रीय पुरस्कार, एनर्जी ग्लोब पुरस्कार इत्यादी. 2016 मध्ये न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या नावाने बिंदेश्वर पाठक दिन साजरा करण्यात आला.
बिंदेश्वर म्हणायचे की, ‘सरकारने आधी शौचालये बांधावीत आणि मग पैसे शिल्लक राहिले तर ती स्मार्ट सिटी. कारण शहरांबरोबरच गावांचा विकासही आवश्यक आहे.’
ADVERTISEMENT