WhatsApp Ban : …तर आयुष्यभरासाठी व्हाट्सअ‍ॅप होईल बॅन! ‘या’ चुका आजच टाळा

प्रशांत गोमाणे

21 Nov 2023 (अपडेटेड: 21 Nov 2023, 12:38 PM)

व्हाट्सअ‍ॅपमुळे टेक्स्ट मॅसेजचे प्रमाण कमी झाले आहेत. अशा अवस्थेत जर तुमचं व्हाट्सअ‍ॅप बॅन झालं आणि तुम्हाला टेक्स्ट मॅसेज सर्विसचा फायदा उचलता नाही, तर काय कराल?

whatsapp account banned do not do this thing by mistake tech story

whatsapp account banned do not do this thing by mistake tech story

follow google news

WhatsApp Banned Account : जगप्रसिद्ध सोशल मेसिजिंग अ‍ॅप असलेल्या व्हाट्सअ‍ॅपच्या युझर्सची दिवसागणिक संख्या वाढत चालली आहे. या वाढत्या युझर्समुळे व्हाट्सअ‍ॅप आणखीणच पॉप्युलर होत चाललंय. व्हाट्सअ‍ॅपमुळे कोणताही फोटो, फाईल एका क्लिकवर दुसऱ्या युझर्सपर्यंत पोहोचतेय. या अ‍ॅपमुळे टेक्स्ट मॅसेजचे प्रमाण कमी झाले आहेत. अशा अवस्थेत जर तुमचं व्हाट्सअ‍ॅप बॅन झालं आणि तुम्हाला टेक्स्ट मॅसेज सर्विसचा फायदा उचलता नाही, तर काय कराल? (whatsapp account banned do not do this thing by mistake tech story)

हे वाचलं का?

ज्या व्हाट्सअ‍ॅपवर तुम्ही इतके निर्भर आहात आणि तुमची सोशल लाईफ चालली आहे. ते व्हाट्सअ‍ॅपवर बॅन होऊ शकते. आणि या बॅनमुळे तुम्ही व्हाट्सअ‍ॅपवर वापरण्यापासून कायमचे वंचित राहू शकाल. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे व्हाट्सअ‍ॅप बॅन टाळायचे आहे तर खालील दिलेल्या टिप्स फॉलो करा.

हे ही वाचा : जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण! दगडफेक, वाहनांची तोडफोड; नेमकं काय घडलं?

Spam मेसेजपासून दुर राहा

जर तुम्हाला व्हाट्सअ‍ॅप बॅन टाळायचं आहे, तर स्पॅम मेसेजपासून दुर राहा. तुम्ही सतत व्हाट्सअ‍ॅपवरून ग्रुप किंवा ब्रॉडकास्टींगद्वारे स्पॅम मेसेज शेअर केलात, तर तुमचे अकाऊंट बॅन होऊ शकते.

फेक न्युज टाळा

व्हाट्सअ‍ॅप युझर्सने फेक न्युज शेअर करणे टाळले पाहिजे. अनेक युझर्स एखादा मेसेज अथवा बातमी त्याची पडताळणी न करता इतरांना शेअर करत असतात. असे केल्याने फेक न्युजला समर्थन मिळते. या फेक न्युज समाजासाठीही घातक ठरू शकतात आणि तुमचं अकाऊंटही बॅन होऊ शकतं.

पॉर्नोग्राफीपासून दुर राहा

व्हाट्सअ‍ॅप जर तुम्ही चुकूनही पॉर्नोग्राफीशी संबंधित क्लिप शेअर केली, तर ते कायद्याने गुन्हा देखील आहे, आणि यामुळे तुमचे अकाऊंट बंद देखी होऊ शकतो.

हे ही वाचा : Rohit Sharma : “सूर्यकुमारवर विश्वास नव्हता, तर…”, गंभीर-अक्रमने रोहितला सुनावलं

फेक नाव आणि फोटो

व्हाट्सअ‍ॅप युजर्स कोणत्याही दुसरा य़ुझर्सचा फोटो आणि नावाचा वापर करू शकत नाही. जर तुम्ही कोणत्याही सेलिब्रिटी किंवा खेळाडूचा फोटो लावलात तर ती वेगळी गोष्ट आहे. जर तुम्ही एखाद्या सामान्य व्यक्तीचा फोटो फसवणूक करण्यासाठी किंवा एखाद्याचे नुकसान करण्यासाठी वापरत असाल तर यामुळे तुमचे खाते बॅन केले जाईल.

थर्ड पार्टी अ‍ॅप वापरणे टाळा

जर तुम्ही व्हाट्सअ‍ॅप प्रमाणेच दुसरे अ‍ॅप WhatsApp Delta, GB WhatsApp, WhatsApp Plus चा वापर करत असाल, तर तुमचं अकाऊंट कायमस्वरूपी बॅन होईल. तसेच जर अनेक युझर्सनी तुमच्या व्हॉट्सअॅप अकाउंटची तक्रार केली तर तुमचे अकाउंट बॅन केले जाऊ शकते. त्यामुळे स्पॅम सारखी सामग्री शेअर करू नका.

    follow whatsapp