प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस (IPF) या गंभीर आजारामुळे निधन झालं. हा एक फुफ्फुसाचा आजार असून, यावर कोणताही उपचार नाही. या आजारात फुफ्फुसाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊन, श्वास घेणं कठीण होते.
ADVERTISEMENT
धु्म्रपान करणे, वाढलेलं वय आणि आनुवांशिकतेमुळे हा आजार होतो. उपचार उपलब्ध नसले तरी, औषध आणि इतर उपचारांमुळे रुग्णाच्या फु्फ्फुसाची गुणवत्ता सुधारू शकते. फुफ्फुसातील हवेच्या पिशव्या (अल्व्होली) भोवती असलेल्या भागावर (ऊतींवर) या आजारामुळे परिणाम होतो.
इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस म्हणजे काय?
यूएस नॅशनल हार्ट, लंग्ज अँड ब्लड इन्स्टिट्यूट (NIH) ने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात कारणांमुळे फुफ्फुसाचे ऊतक जाड आणि कठोर होते तेव्हा हा रोग होतो. कालांतराने, यामुळे फुफ्फुसावर कायमचे डाग तयार होऊ शकतात. यालाच फायब्रोसिस देखील म्हणतात. त्यामुळे रुग्णाला श्वास घेणं कठीण होते. जे लोक धूम्रपान केल्यानं किंवा अनुवंशिकतेने हा आजार होतो.
इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमध्ये काय होते?
एनआयएचच्या दाव्यानुसार, या रोगामुळे श्वास घेणं आणि फुफ्फुसातून ऑक्सिजन शरीराच्या उर्वरित भागात पोहोचवणं कठीण होतं. निरोगी फुफ्फुसात, ऑक्सिजन सहजपणे हवेच्या पिशव्याच्या भागातून केशिका आणि रक्तप्रवाहात जातो. आयपीएफच्या बाबतीत, फुप्फुसाताचा ठराविक भाग घट्ट किंवा जाड होतात. यामुळेच ऑक्सिजन रक्तात जाणं कठीण होतं.
डायसोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसचा धोका कशामुळे वाढतो?
वयानुसार, IPF चा धोका वाढतो. बहुतेक लोकांना त्यांच्या वयाची साठी किंवा सत्तरी ओलांडल्यानंतर हा रोग झाल्याचं दिसून आलं आहे. वेगवेगळ्या कारणांपैकी सर्वात जास्त आढळलेलं एक कारण म्हणजे धूम्रपान. विशेषत: महिलांपेक्षा पुरूषांना हा रोग जास्त प्रमाणात होत असल्याचं दिसून आलं आहे. तुमच्या पालक किंवा भावंडांना IPF असेल, तर तुम्हाला हा रोग होण्याचा धोका जास्त आहे.
हे ही वाचा >>Ajit Pawar: अजितदादा अस्वस्थ... अधिवेशन सोडून तडकाफडकी गेले दिल्लीला, घडलं तरी काय?
इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसची लक्षणं काय?
IPF च्या लक्षणांमध्ये दम लागणे, सतत कोरडा खोकला येणे, सांधे आणि स्नायू दुखणे, थकवा आणि वजन कमी होणे अशा गोष्टींचा समावेश आहे. वेळीच या लक्षणांकडे लक्ष न दिल्यास कालांतराने, आराम करत असतानाही श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागतो. कोरडा खोकला कायम राहणे हे सुद्धा एक लक्षण आहे. खोकलाही कालांतराने वाढत जातो. यामुळेच सांधे आणि स्नायूंमध्येही वेदना होऊ शकतात.
इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसचा उपचार काय?
आयपीएफवर सध्या कोणताही इलाज नाही. पण औषधांमुळे आणि आणखी काही गोष्टींमुळे फुफ्फुसाचे नुकसान कमी होण्यास आणि रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत होऊ शकते. निन्टेडानिब किंवा पिरफेनिडोन हे घटक फुफ्फुसांना चांगलं काम करण्यास मदत करू शकतात. याव्यतिरिक्त, अँटासिड्स पोटातील आम्ल फुफ्फुसात जाण्यापासून आणि IPF मुळे प्रकृती खराब होण्यापासून रोखू शकतं. इतर उपचारांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास कमी करण्यासाठी शरिराच्या क्षमतेत सुधार करण्यासाठी ऑक्सिजन थेरपी आणि श्वासोच्छवासास मदत करण्यासाठी व्हेंटिलेटर सपोर्टचीही मोठी मदत होते.
ADVERTISEMENT
