1971 Pakistan vs Bangladesh War : सप्टेंबर 1972 ची ही गोष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत वाद सुरू होता. मुद्दा बांगलादेशचा होता. महासभेचे (Genral Assembly) सदस्य बनवावे, अशी बांगलादेशची मागणी होती. याला पाकिस्तान विरोध करेल हे स्वाभाविक होते आणि त्यांनी ते केले. पाकिस्तानने 21 सदस्यांचे संपूर्ण शिष्टमंडळ पाठवले होते. पण विशेष बाब म्हणजे या शिष्टमंडळाचा नेता काही महिन्यांपूर्वीपर्यंत बांगलादेशचा नागरिक होता. सामान्य नागरिक नव्हे तर राज्याचा राजा होता. (Why did a Buddhist king Tridev Roy chose pakistan during 1971 bangladesh war)
ADVERTISEMENT
या राजाचा बौद्ध धर्मावर विश्वास होता. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजाचा सामना ज्या बांगलादेश शिष्टमंडळाशी होणार होता त्याचे नेतृत्व करणारी महिला राजाची आई होती. म्हणजेच राजमाता. बांगलादेश युद्धात हे माय लेक कसे समोरासमोर आले? बौद्ध राजाने आपले राज्य पाकिस्तानसाठी का सोडले? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
Nanded Hospital : नांदेडमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू का झाला? खरंच औषधी नव्हती का?
चटगाँग हिल आणि चकमा जमात
बांगलादेशच्या चटगाव (पूर्वीचे पूर्व बंगाल) प्रांतातून या कहाणीची सुरूवात होते. चटगावचा डोंगराळ भाग भारतातील त्रिपुरा आणि मिझोराम प्रदेशांना लागून आहे. येथे विविध जमाती राहतात. ज्यांना एकत्रितपणे झुम्मा म्हणतात. पेरणी आणि कापणीच्या पद्धतीमुळे येथील लोकांना हे नाव पडलं. कारण, त्याला झूम शेती म्हणतात. या शेती पद्धतीत झाडांच्या वरच्या फांद्या छाटल्या जातात. जेणेकरून सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकेल. यानंतर कापलेल्या फांद्या जाळून त्याची राख शेतात पसरवली जाते. आणि ते पुन्हा शेतीसाठी वापरले जाते.
या पद्धतीचा अवलंब करणाऱ्या अनेक जमाती चटगावच्या डोंगराळ भागात राहतात. त्यापैकी चकमा हा सर्वात प्रमुख आहे. चकमा लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. असे मानले जाते की हे लोक गौतम बुद्धांच्या शाक्य परंपरेतून उद्भवले आणि मगध सोडल्यानंतर त्यांच्या पूर्वजांनी पर्वतांमध्ये आश्रय घेतला. त्यांची भाषा इंडो-आर्यन कुटुंबातील भाषेच्याही जवळ आहे, जी उत्तर भारतातील इतर भाषांसारखीच आहे.
चकमा हा शब्द संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ शक्तिशाली आहे. चकमा लोकांना नेहमीच शक्तिशाली योद्धा मानले गेले आहे. 15व्या ते 17व्या शतकादरम्यान हे लोक बर्माच्या राखीन राजवंशासाठी काम करायचे. चकमा अनेक जमातींमध्ये विभागले गेले. पण सर्व जमातींचा राजा असायचा. 18 व्या शतकाच्या सुरुवातीला चकमा राज्य आणि मुघल यांच्यात एक करार झाला. ज्या अंतर्गत चकमा दरवर्षी मुघलांना कर देत असत. 1757 मध्ये प्लासीचे युद्ध झाले. त्यानंतर बंगाल ब्रिटिशांच्या ताब्यात आला.
इंग्रज आणि चकमा राज्य यांच्यात 10 वर्ष युद्ध झाले. शेवटी, 1787 मध्ये चकमांनी ईस्ट इंडिया कंपनीची अधीनता स्वीकारली. दरवर्षी चकमा इंग्रजांना 20 हजार किलो कापूस देणार असे ठरले. त्या बदल्यात इंग्रजांनी चकमांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचे टाळले. ही व्यवस्था स्वातंत्र्यापर्यंत चालू होती. फाळणीनंतर चकमांचा हा भाग पाकिस्तानात गेला आणि इथूनच मोठी समस्या सुरू झाली.
Nanded Hospital : 31 रुग्णांच्या मृत्यूंबद्दल एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
फाळणीच्या वेळी चटगाव पाकिस्तानात गेले
चटगावच्या डोंगराळ भागातील 96% लोकसंख्या गैर-मुस्लिम होती. पण तरीही सीमा आयोगाने हा भाग पाकिस्तानला दिला. काँग्रेसनेही याला कडाडून विरोध केला. पण जे काही झाले होते. ते बदलता आले नाही. त्यावेळी नलिनाक्ष रॉय हा चकमा राज्याचा राजा होता. 1935 मध्ये नलीनाक्ष राजा झाला. त्याला आपली सत्ता टिकवायची होती. त्यामुळे पाकिस्तानमध्ये विलीन होण्याच्या बदल्यात त्यांनी पाकिस्तानकडून एक वचन घेतले, त्यानुसार त्यांची स्वायत्तता अबाधित राहायची. त्यामुळे विलीनीकरणानंतरही नलिनाक्ष राजाच राहिला. पण नंतर विलीनीकरणानंतर काही वर्षांनी चकमांसाठी त्रास सुरू झाला. नलिनक्षा रॉय यांचे 1951 मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा त्रिदेव रॉय याला राजा बनवण्यात आलं.
त्रिदेव रॉय कमी अनुभवी होते. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान सरकारशी वागण्यात चूक केली. 1962 मध्ये त्यांच्या परिसरातून वाहणाऱ्या नदीवर सरकारने धरण बांधले. कर्णफुली नदीवर हे धरण बांधण्यात आले. ज्यामुळे चकमांच्या गावांमध्ये पूर आला. चकमा लोक अल्पसंख्याक असल्यामुळे आधीच त्रस्त होते. या पुराने त्यांना आणखीनच असहाय्य केले. त्यामुळे चकमा लोक सीमा ओलांडून भारताच्या दिशेने येऊ लागले. थोडेसे विषयांतर करून, चकमांचा मुद्दा देखील प्रासंगिक आहे कारण 2019 मध्ये, जेव्हा नागरिकत्व सुधारणा कायदा संमत झाला होता. चकमांनी भारतीय नागरिकत्वाची मागणी जोर धरू लागली. याला ईशान्येकडील स्थानिक लोकांचा मोठा विरोध होता.
तसंच, 1960 च्या अखेरीस, पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये मतभेद सुरू झाले. पूर्व पाकिस्तानात निदर्शने सुरू झाली. चकमांची परिस्थिती बिकट होती. त्यांचा राजा त्रिदेव रॉय यांना बंगाली विरोधकांवर किंवा पाकिस्तानी सैन्यावर राग आणायचा नव्हता. त्यामुळे या सर्व गदारोळात त्रिदेव रॉय यांनी तटस्थ राहणे पसंत केले. पण नंतर सत्तेसोबत राहणे हा फायद्याचा सौदा आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे नंतरच्या काळात ते पश्चिम पाकिस्तानी सरकारच्या तराजूपुढे झुकू लागले. असे असूनही, 1970 मध्ये पाकिस्तानात निवडणुका झाल्या तेव्हा शेख मुजीबुर रहमान यांनी त्यांना त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली.
त्रिदेव रॉय यांनी नकार दिला आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहिले. त्रिदेव यांनीही आपली जागा जिंकली. मात्र, मुजीबच्या अवामी लीगला देशात जास्त जागा मिळाल्या. अवामी लीगला संपूर्ण पूर्व पाकिस्तानात फक्त दोन जागा कमी पडल्या होत्या. त्यापैकी एक त्रिदेव रॉय यांची जागा होती.
Cyber Crime : मुंबईत ‘डिजिटल दरोडेखोर गँग’; बोगस कागदपत्रं, 200 क्रेडिट कार्ड अन्…
बौद्ध राजाने का केला त्याग?
यानंतर मुजीबच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या होत्या. असे असतानाही पाकिस्तानचे अध्यक्ष याह्या खान यांनी त्यांचे विरोधक झुल्फिकार अली भुट्टो यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. त्याचा परिणाम असा झाला की पूर्व पाकिस्तानने बंड केले. पाक सैन्याने बंगालींची सामुहिक हत्त्या केली. 1971 चे युद्ध सुरू झाले आणि शेवटी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण काळात त्रिदेव सिंह गप्प राहिले. इतके की, त्यांनी रझाकारांनी केलेल्या हत्याकांडावर टीकाही केली नाही. 1971 चे युद्ध सुरू झाले तेव्हा त्रिदेव रॉय यांना वाटले की त्यांनी योग्य बाजू निवडली. पण नंतर लवकरच त्यांना वास्तवाला सामोरे जावे लागले.
पाकिस्तानच्या पराभवानंतर बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा त्रिदेव रॉय मोठ्या संकटात सापडले. युद्धानंतर बांगलादेशातील लोक पाकिस्तानच्या समर्थकांना शिक्षा देत होते. राजा त्रिदेव रॉय यांना असे वाटले की लवकरच त्यांचेही असेच हाल होतील. म्हणून त्यांनी सिंहासन सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांचा 12 वर्षांचा मुलगा देवाशिष याला राजा करण्यात आलं. त्रिदेव रॉय यांना वाटले की, यामुळे त्यांच्यावरून लक्ष विचलित होईल. पण नंतर परिस्थिती बिघडू लागली. त्रिदेव रॉय यांच्या चुकीचे परिणाम चकमा लोक भोगत होते.
त्रिदेव रॉय यांना समजले की जोपर्यंत ते बांगलादेशात आहेत, तोपर्यंत चकमांचे लक्ष्य बनत राहील. त्यामुळे त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला. त्रिदेव रॉय यांच्याकडे एकच पर्याय होता. की त्यांनी पाकिस्तानात जावे. त्रिदेव रॉय 1971 मध्ये पाकिस्तानात गेले. जिथे त्यांचे मोकळ्या मनाने स्वागत करण्यात आले. पाकिस्तान सरकार त्याच्यावर इतके खूश होते की त्यांना सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. ही पाकिस्तानची चाल होती. बांगलादेशविरुद्ध त्रिदेव उपयोगी पडेल हे पाकिस्तानला माहीत होते. त्यामुले त्यांनी त्रिदेव यांचा चांगला उपयोग केला.
1972 मध्ये त्यांना पाकिस्तानी मिशनचे नेते बनवण्यात आले आणि त्यांना संयुक्त राष्ट्र संघात पाठवण्यात आले. जेणेकरून तेथे ते बांगलादेशच्या दाव्याला विरोध करू शकतील. ही एक धूर्त चाल होती. पण बांगलादेशचा तेव्हाचा नेता मुजीब हाही पारंगत होता. त्याने राजमाता बेनिता रॉय यांना त्यांच्या शिष्टमंडळाच्या नेत्या म्हणून पाठवले. बेनिता रॉय या त्रिदेव रॉय यांच्या आई होत्या. दोघेही UN मध्ये आमनेसामने आले आणि बेनिता रॉय विजयी झाल्या. 1974 मध्ये बांगलादेशला संयुक्त राष्ट्र महासभेचे सदस्यत्व मिळाले. दुसरीकडे त्रिदेव रॉय परदेशातच राहिले. आपल्या लोकांपासून दूर याचे त्यांना दु:ख झाले. पण तरीही त्यांनी संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
Crime : दुधात विष मिसळलं अन्…, तीन सख्ख्या बहिणींचा आई-वडिलांनीच का घेतला जीव?
पाकिस्तानचे भावी अध्यक्ष
झुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी त्रिदेव रॉय यांना अल्पसंख्याक आणि पर्यटन मंत्रालय दिले. भुट्टो यांना त्यांना राष्ट्रपती बनवायचे होते. पण त्यानंतर पाकिस्तानचे नवीन संविधान आडवे आले. या घटनेनुसार केवळ मुस्लिमच पाकिस्तानचा राष्ट्रपती होऊ शकतो. त्रिदेव रॉय यांना राष्ट्रपती व्हायचे असते तर त्यांना इस्लाम धर्म स्वीकारावा लागला असता. आयुष्यभर बौद्ध असलेले त्रिदेव रॉय यासाठी तयार नव्हते. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदाची खुर्ची मिळू शकली नाही. झिया उल हक सत्तेवर आल्यावर त्रिदेव यांचे आयुष्य पुन्हा बदलले.
1977 मध्ये पाकिस्तानात सत्तापालट झाली. झिया उल हक यांनी भुट्टो यांना फाशी दिली. त्याचवेळी त्यांनी भुट्टोच्या जवळच्या लोकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्रिदेव रॉय यांना संपवण्यासाठी झियाने त्यांना राजदूत बनवले आणि दूर अर्जेंटिनाला पाठवले. 1998 मध्ये झिया उल हक यांचे विमान अपघातात निधन झाले तेव्हाच त्रिदेव परत येऊ शकले. जियाच्या मृत्यूनंतर त्रिदेव काही काळ श्रीलंकेत राहिले. त्यानंतर पाकिस्तानात परतल्यानंतर ते राजकारणापासून दुरावले. धर्मप्रसाराचे कार्य त्यांनी सुरू केले. ते पाकिस्तान बुद्धिस्ट सोसायटीचे प्रमुख झाले. अखेर 2012 मध्ये त्यांचे निधन झाले.
ADVERTISEMENT