Winter health tips : नोव्हेंबर सुरू होताच वातावरणात बदल जाणवायला लागले आहेत. उकाडा कमी झाला असून, आता हळूहळू थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. आयुर्वेदानुसार हिवाळा ऋतूमध्ये नैसर्गिकरित्या माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. थंड हवामानात, शरीराचे तापमान कमी होतं आणि नवीन हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीरात थर्मोरेग्युलेशन प्रक्रिया पार पडते.
ADVERTISEMENT
हिवाळ्यातील हवामानातील बदलांमुळे अनेक आजारही पडतात. पण काही गोष्टींची खबरदारी घेतल्यास हे धोके टाळून तुम्हाला थंडीचा आनंद लुटता येणार आहे. त्यामुळे हिवाळ्यात नेमकी कशी काळजी घ्याल, जाणून घेऊ.
आहार
आहारात धान्य, मांस, मासे, कोंबडी, शेंगा, सुका मेवा, औषधी वनस्पती, मसाले, ताजी फळे आणि भाज्या यांचा समावेश केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसंच व्हिटॅमिन-सी असलेले पदार्थांचं अधिक सेवन केल्यानंही रोगप्रतिकारशक्तीला फायदा होणार आहे.
व्यायाम करत राहा
हे ही वाचा >>Cholesterol : कोलेस्ट्रॉल करु शकतं तुमचा घात, 'हे' खाद्यपदार्थ खाणं आजच थांबवा!
हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक हालचाली होणं गरजेचं आहे. त्यामुळे योगासनं, धावणे, चालणे किंवा खेळणे अशा गोष्टी करून तुम्ही तुमचं शरीर लवचीक आणि उबदार ठेवू शकता. यामुळे, फ्लू किंवा सर्दी सारख्या साथीच्या आजारांपासून संरक्षण करताना रोगप्रतिकार शक्ती चांगली राहील आणि तुम्ही तंदुरुस्त राहाल.
मॉइश्चरायझर वापरा
हिवाळ्यात त्वचेला मोठ्याप्रमाणात त्रास होतो. थंडीमुळे त्वचेचा कोरडी आणि फुटते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
पाणी प्या
दररोज आवश्यक तेवढं प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. पाणी आपलं शरीर स्वच्छ करण्यास आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतं. तसंच शरीराच्या पेशींमध्ये पोषक द्रव्ये वाहून नेण्यासाठी आणि शरीरातील पोषक द्रव्य संतुलित करण्यासाठी मदत करत असतं.
झोप घ्या
चांगली झोप शरीराची रोगप्रतिकारक शक्ती संतुलित ठेवण्यास मदत करते. चांगले आरोग्य राखण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे किमान 7-8 तास झोप घ्या.
ADVERTISEMENT