ladki Bahin Yojana: ...तरच तुम्हाला मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस! महिलांनो एकदा अटी तर वाचा

मुंबई तक

16 Oct 2024 (अपडेटेड: 16 Oct 2024, 09:34 AM)

Mazi ladki Bahin Yojana Diwali Bonus Update: राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमातून अनेक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केली आहे.

लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस

लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलांनो! दिवाळी बोनसबाबत सर्वात मोठी अपडेट आली समोर

point

दिवाळी बोनस मिळवण्यासाठी 'या' अटी कराव्या लागतील पूर्ण

point

कोणत्या महिलांना दिवाळीचा बोनस मिळेल?

Mazi ladki Bahin Yojana Diwali Bonus Update: राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमातून अनेक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केली आहे. दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या ते चौथ्या हफ्त्यापर्यंतची रक्कमही महिलांच्या खात्यात डिपॉझीट झाल्याचं सरकारी अधिकारी सांगतात.

हे वाचलं का?

अशातच दिवाळाआधी महिलांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं महिलांना 3000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. तर काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. म्हणजे एकूण 5500 रुपयांचा दिवाळी बोनस या महिलांना दिला जाणार आहे.

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : 'या' राशींच्या व्यक्ती प्रेमात असतात लकी! तुमचं लव्ह लाईफ कसं राहील?

सरकारने महिलांसाठी ही महत्वाकांशी योजना सुरु केली असून महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. सरकारकडून  ही रक्कम थेट महिलांच्या खात्यावर जमा केली जाते. पण यासाठी महिलांना काही नियमांचं पालन करावं लागतं. म्हणजेच महिलेचं वय 21 ते 60 वर्षांमध्ये असलं पाहिजे. ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

येत्या काही दिवसात दिवाळीचा सण-उत्सव सुरु होणार आहे. त्यासाठी महिलांनी शॉपिंग करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. अशातच महिलांना सरकारकडून 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे. पण ही रक्क अशा महिलांनाच मिळणार आहे, ज्या महिला या योजनेच्या अटी पूर्ण करणार आहेत.

    follow whatsapp