Ladki Bahin Yojana 3rd Installment Update : माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 कोटींहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून दोन हफ्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्व महिलांना तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतीक्षा लागली आहे. अशातच आता लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हफ्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे. आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होणार आहेत. जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता कधी मिळणार?
माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे. ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे, ज्यांच्या बँक खात्यात डीबीटी(DBT) एनेबल आहेस अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे.
हे ही वाचा >> Today Gold Rate: बाईई! काय हा प्रकार? सोनं महागलं; खिशाला लागणार कात्री, 24 कॅरेटचा भाव एव्हढा...
माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्ट 2024 ला देण्यात आला आहे. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची वाट पाहत आहेत. आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या पैशांची तारीख आणि वेळ समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 15 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु, ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती दिली नाहीय.
15 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसै जमा होतील असं बोललं जात आहे. त्यामुळे सर्व महिलांनी तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची वाट पाहावी लागणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केल्यानंतरी अनेक महिलांनी शंका उपस्थित केली आहे. काही महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम मिळाली नसल्याचं समजते. अशा लाभार्थ्यांनी सर्वात आधी आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावा आणि डीटीबी एनेबल करावं.
ADVERTISEMENT