Ladki Bahin Yojana latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येते आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना तिसऱ्या हफ्त्याच्या पैशांची प्रतीक्षा लागली आहे. महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होतील, पण त्यासाठी महिलांना काही महत्त्वाची कामं लगेच करावी लागणार आहेत.
ADVERTISEMENT
तुम्ही या योजनेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांनी अर्ज मंजूर झाला आहे की नाही, हे तपासावं. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. पण अर्ज भरून तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासोबतच तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. (New information comes to light regarding Chief Minister Majhi Ladki Bahine Scheme. Or women who are eligible for the scheme have to wait till the third week of Paisa. Rs 4500 will be deposited in the women's account)
लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता, त्यावेळी आधारकार्डशी संबंधीत अससेली माहिती भरावी लागते. तसच बँकेचा तपशीलही जोडावा लागतो. याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असतो. तसच आधारकार्डला चालू बँक खातंही जोडलेलं असतं.
हे ही वाचा >> केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे एकाचा मृत्यू! Nipah Virus किती धोकादायक? लक्षण आणि उपाय काय?
तुमचे बँकेचे खाते आधारकार्डशी लिंक नसेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जर तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या. काही दिवसातच बँका तुमचं अकाऊंट आधारशी लिंक करून देतात. तसेच तुमचे जूने अकाऊंट लिंक असेल तर ते देखील काढून त्याजागी नवीन अकाऊंट अॅड करता येणार आहे. ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा? तर काही व्यक्तींची लव्ह लाईफ...
माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्ट 2024 ला देण्यात आला आहे. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची वाट पाहत आहेत. आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या पैशांची तारीख आणि वेळ समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 15 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु, ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती दिली नाहीय. 15 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसै जमा होतील असं बोललं जात होतं.
ADVERTISEMENT