Amgaon Vidhan Sabha Election : काँग्रेसचं पारडं जड, पण, 'या' गोष्टीचा भाजपला फायदा होणार?

भागवत हिरेकर

17 Jun 2024 (अपडेटेड: 17 Jun 2024, 05:54 PM)

Amgaon Vidhan Sabha Election 2024 : आमगाव विधानसभा मतदारसंघा गोंदिया जिल्ह्यात असला तरी तो गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात भाजपला निवडणूक जाण्याची शक्यता आहे, ती कशी हेच जाणून घ्या...

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी... आमगाव विधानसभा मतदारसंघातील स्थिती काय?

आमगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

follow google news

Sahasram Korote Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत विदर्भातील निकाल सगळ्यांनाच धक्का देणारे ठरले. भाजप प्रणित महायुतीला फारसे यश मिळाले नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. लोकसभा निवडणुकीचे कल बघता काही मतदारसंघात भाजपसाठी लढाई कठीण दिसत आहे. आमगाव विधानसभा मतदारसंघही अशाच मतदारसंघापैकी एक आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात... (amgaon vidhan sabha election detail story)

हे वाचलं का?

आमगाव विधानसभा मतदारसंघ हा तसा गोंदिया जिल्ह्यातील आहे. पण, त्याचा समावेश गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात केलेला आहे. आमगाव विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये काँग्रेसचा विजय झाला होता.

असं असलं तरी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा विजय झाला होता. अशोक नेते सलग दोन वेळा या मतदारसंघातून खासदार झाले. पण, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलले आहे. यावेळी काँग्रेसचे नामदेव किरसान हे विजयी झाले. 

सध्या आमगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सहसराम कोरोटे आमदार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजप आणि काँग्रेसला किती मते मिळाली हे बघणं महत्त्वाचं आहे.

आमगाव विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला मिळालेली मते
पक्ष उमेदवार मते
भाजप अशोक नेते 81695
काँग्रेस नामदेव किरसान 92564

भाजपचे अशोक नेते यांना आमगाव विधानसभा मतदारसंघात 81 हजार 695 मते मिळाली, तर काँग्रेसच्या नामदेव किरसान यांना 92 हजार 564 मते मिळाली. या मतदारसंघातून 10 हजार 869 इतके मताधिक्य मिळाले.

हेही वाचा >> भाजपसाठी गडचिरोली विधानसभा जिंकणे अवघड? काँग्रेसची स्थिती काय?

लोकसभा निवडणुकीत जे मतदारांनी जो कौल दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही दिला, तर भाजपला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. त्या आधी बघूयात की 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या आमगाव मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराला किती मते होती, याबद्दल...

आमगाव विधानसभा निवडणूक २०१९
पक्ष उमेदवार मते 
काँग्रेस कोरोटे सहसराम 88265
भाजप संजय पुरम 80845
वंचित सुभाष रामरामे 2360


2019 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्या दोन उमेदवारांना मिळालेली मते बघितली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला 7 हजार 420 इतके मताधिक्य मिळाले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र, हे चित्र बदलेलं दिसलं. काँग्रेसच्या उमेदवाराला 10 हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले आहे.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

आमगाव विधानसभा मतदारसंघात 2024 च्या निवडणुकीत काय होणार याबद्दल उत्सुकता आहे. 1999 आणि 2004 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद सोडला तर या मतदारसंघात परिवर्तन बघायला मिळालं आहे. त्याची पुनरावृत्ती झाली, तर काँग्रेसला पराभव स्वीकारू लागू शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जरी मताधिक्य मिळालं असलं तरी काँग्रेसला पूर्वइतिहासाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

हेही वाचा >> शिंदेंचे 17 आमदार 'डेंजर झोन'मध्ये, विधानसभा जिंकणं कठीण? 

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समर्थन करणारा मतदारांचा एक वर्ग होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचा फारसा परिणाम दिसला नाही. तशीच स्थिती विधानसभेत असेल, तर त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होईल. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहिली, तर काँग्रेसलाचे पारडे जड आहे. पण, या मतदारसंघातील मतदारांनी परंपरा पाळली, तर या मतदारसंघातून भाजपही विजयाचा गुलाल उधळू शकते. पण, यासाठी भाजपला रणनीती आखून काम करावे लागेल, अशी स्थिती आहे. 

हेही वाचा >> विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी 'एवढ्या' जागा जिंकतील? यादीच पाहा!

2014 पासून देशात आणि राज्यात (मधल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ वगळता) महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे सरकारविरोधी नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. महागाई, बेरोजगारी आणि इतर स्थानिक प्रश्नांचा फटकाही भाजपला बसू शकतो. 

    follow whatsapp