Today Chanakya Exit Poll : राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी काल बुधवारी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झालं. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय सामना पहिल्यांदाच रंगल्याने या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. शनिवारी 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी, चाणक्य एक्झिट पोलने खळबळजनक आकडेवारी समोर आणली आहे. राज्यात महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार येणार? असा सवाल उपस्थित झाला असतानाचा चाणक्यच्या एक्झिट पोलने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्यात भाजपप्रणीत महायुतीला (186) बहुमत मिळणार असून महाविकास आघाडीला (111) जागांवरच समाधान मानावं लागणार आहे. तर इतर घटक पक्ष आणि अपक्षांना एकूण 18 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, भाजपप्रणीत महायुतीला 175 जागा मिळणार आहेत. यामध्ये इतर पक्षांच्या 11 जागांचा महायुतीला पाठिंबा मिळणार आहे. तर काँग्रेसप्रणीत महायुतीला 100 जागांवर यश मिळणार असून इतर 11 जागांचा पाठिंबा मिळणार आहे. तसच इतर काही घटक पक्ष आणि अपक्षांच्या एकूण 18 जागा असणार आहेत. तसच भाजपप्रणीत महायुतीला एकूण 48 टक्के मताधिक्य मिळालं असून काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीला एकूण 42 टक्के मताधिक्य मिळाल्याचा अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर इतरमध्ये 19 टक्के मताधिक्क्याचा समावेश आहे.भाजपप्रणीत महायुतीला मराठा समाजाच्या 48 टक्के मतदारांचा आणि काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीला मराठा समाजाच्या 38 टक्के मतदारांचा कल मिळाला आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Elections Exit Poll : कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय? अख्खी यादी आली समोर
महायुतीला एससी कॅटेगरीच्या 49 टक्के मतदारांचा कल तर महाविकास आघाडीला 35 टक्के मतदारांचा कल मिळाल आहे. मुस्लीम समाजाच्या 8 टक्के मतदारांचा कल महायुतीला, तर 75 टक्के कल महाविकास आघाडीला मिळाला आहे. एसटी कॅटगरी महायुतीला 49 टक्के, तर महाविकास आघाडीला 34 टक्के मतदारांचा कल मिळाला आहे. तसच ओबीसींच्या एकूण 50 टक्के मतदारांचा कल भाजपप्रणीत महायुतीला तर 32 टक्के मतदारांचा कल काँग्रेसप्रणीत मविआला मिळाल्याचा अंदाज या चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT