Mumbai : खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना इम्पोर्टेड माल नहीं चलेगा... असं विधान केलं होतं. शायना एनसी यांच्याकडून अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. अरविंद सावंत यांच्या वक्तव्यातील 'माल' या शब्दावर शायना एनसी यांनी घेतला होता. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेत अरविंद सावंत यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.त्यावर आता मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांनीही संताप व्यक्त केला आहे. बाळासाहेब असते आणि एखाद्या शिवसैनिकानं असं केलं असतं तर त्यांनी थोबाड फोडलं असतं असं शिंदे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Amit Thackeray : शिवाजी पार्क दीपोत्सव प्रकरणी चौकशी सुरू, ठाकरेंच्या शिवसेनेच्या तक्रारीची दखल, अमित ठाकरेंची उमेदवारी...
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ वाढवून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. अशातच मुंबईतले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या एका वक्तव्यानं एक नवा वाद उभा राहिला आहे. मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शायना एनसी या निवडणूक लढणार आहेत. तर मविआकडून अमिन पटेल यांना उमेदवारी आहे. या लढतीविषयी बोलतानाच अरविंद सावंत यांनी या मतदारसंघात 'बाहेरचा माल चालणार नाही' असं म्हटल्यानं वादाला तोंड फुटलंय. त्यानंतर आता माल या शब्दावर आक्षेप घेत शिंदेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शायना एनसी यांनी नागपाडा पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> Nagpur : दहशतवाद्यांच्या टार्गेटवर विमानतळं, मी फक्त फडणवीसांनाच... देशभर धमकीचे मेल पाठवणारा सापडला, धक्कादायक माहिती समोर
अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महिलांचा अपमान करणं दुर्दैवी आहे. बाळासाहेब असते आणि शिवसैनिकानं असं केलं असतं तर थोबाड फोडलं असतं. पण सर्व लाडक्या बहिणी मिळून त्यांचा बदला घेतील आणि त्यांना कायमचं घरी बसवतील असं म्हणत शिंदेंनी संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT