Ladki Bahin Yojana : डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरचे देऊ, 1500 रुपयांवरच थांबणार नाही तर... एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

एकनाथ शिंदे म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखादी योजना चालवली जाऊ शकते असं विरोधकांना वाटलं नव्हतं, त्यामुळे त्यांच्यासाठी ते अनपेक्षित होतं. तसंच लाडकी बहीणचे पैसे भविष्यात वाढवू असंही ते म्हणालेत.

Mumbai Tak

मुंबई तक

02 Nov 2024 (अपडेटेड: 02 Nov 2024, 11:59 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी!

point

डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच मिळणार

point

फक्त 1500 रुपयांवर नाही थांबणार, बहिणींना लखपती करणार

CM Eknath Shinde on Ladki Bahin मुंबई : लोकसभेला मिळालेल्या अपयशामुळे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली अशी टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. याबद्दलच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना उत्तर दिलंय. एकनाथ शिंदे म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखादी योजना चालवली जाऊ शकते असं विरोधकांना वाटलं नव्हतं, त्यामुळे त्यांच्यासाठी ते अनपेक्षित होतं असं शिंदे म्हणाले. लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकू नयेत म्हणून आम्ही नोव्हेंबरचे पैसेही ऑक्टोबरमध्ये दिले. याच नोव्हेंबरच्या अखेरीस आम्ही डिसेंबरचे पैसे देणार आहोत असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. 

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >>CM Eknath Shinde : ...तर बाळासाहेबांनी थोबाड फोडलं असतं, अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे संतापले आणि थेट...

 

लाडकी बहीण योजना राज्यात चांगलीच चर्चेत आहे. एकीकडे राज्यातील महिलांकडून स्वागत केलं जातंय, तर दुसरीकडे या योजनेवर टीका सुद्धा होतेय. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठी माहिती दिली. लाडक्या बहि‍णींसाठी आम्ही तत्पर आहोत असं सांगताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. या योजनेच्या विरोधात काँग्रेससह मविआचे लोक कोर्टात गेले. मात्र आम्ही आमच्या लाडक्या बहि‍णींना फक्त 1500 रुपयांपर्यंत नाही तर, त्यामध्ये वाढ करू आणि आमच्या बहि‍णींना लखपती करू. 

 

हे ही वाचा >>CM Eknath Shinde : राज ठाकरेंना मी विचारलंही होतं, पण त्यांनी थेट... संवाद तुटला? दादर-माहिमचा मुद्दा तापला

 

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. राजीव गांधी यांनीच सांगितलं होतं की, केंद्राने एक रुपया दिला तर शेवटी लोकांना 15 पैसे मिळतात. मात्र आता मोदींनी 1 रुपया दिल्यावर एकच रुपया मिळतो असं शिंदेंनी सांगितलं. आम्ही सर्व गाईडलाईन्स फॉलो करुन या योजनेची अंमलबजावणी करत आहोत. कोणीही मायेचा लाल आला तरी या योजनेला बंद करु शकत नाही असं शिंदेंनी सांगितलं. लाडकी बहीण योजानेमुळे विरोधक हादरले आहेत, त्यामुळे ते म्हणतायत की योजना बंद करु आणि आम्हाला तुरूंगात टाकू, मात्र अशा विरोधकांना लाडक्या बहिणी या निवडणुकीत त्यांना घरी बसवतील असा टोला शिंदेंनी लगावला आहे. 

    follow whatsapp