Nagpur Viral Video : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराने जोर धरलाय. सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीनं सध्या प्रचार करताना दिसत आहेत. त्यातच आता नागपूरमध्ये प्रचारादरम्यान घडलेल्या एका घटनेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस आणि भाजपचा संघर्ष अवघ्या देशाने पाहिला आहे. टीका, टिपण्यांपासून सुरु झालेला संघर्ष अनेकदा टोकाला गेल्याचं दिसलं होतं. मात्र नागपूरमध्ये एक सकारात्मक गोष्ट घडताना दिसली आहे. नागपूर मध्य विधानसभेचे उमेदवार असलेले बंटी शेळके हे थेट भाजपच्या कार्यालयात घुसले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Maharashtra Election 2024: कोण कुठे आणि किती जागा जिंकणार, संपूर्ण यादीच आली समोर: सर्व्हे
नागपूर मध्य मतदारसंघात काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बंटी शेळके हे आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजप महायुतीकडून प्रवीण दटके यांना उमेदवारी आहे. दोघांमध्ये तगडी लढत आहे. मात्र आता बंटी शेळके यांनी केलेलं एका गोष्टीमुळे सध्या नागपूरमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. सोमवारी नागपूर मध्य विधानसभेत बंटी शेळके हे संध्याकाळी प्रचार करत असताना ते थेट भाजपच्या मुख्य प्रचार कार्यालयात घुसले. पळत पळत बंटी शेळके बंटी दटके यांच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांनी कार्यालयात जाऊन सर्वांची भेट घेतली. भाजप कार्यकर्त्यांना हात मिळवले, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या या कृत्यामुळे काही क्षण भाजप कार्यकर्तेही गडबडले. मात्र त्यांनीही बंटी शेळके यांच्याशी हात मिळवत शुभेच्छा देताना दिसले.
काँग्रेस उमेदवार बंटी शेळके(Congress Candidate Bunty Shelke) यांनी केलेल्या कृत्यामुळे काँग्रेस समर्थकांकडून त्यांचं चांगलंच कौतुक होताना दिसतंय. "बंटी बाबा शेळके हे भाजप कार्यालयात बसलेल्या लोकांना तर भेटलेच, त्याशिवाय त्यांना शुभेच्छाही दिल्या. राहुल गांधींचं 'मोहोब्बत का दुकान' आणि काँग्रेस पक्षाची मूल्ये पुढे नेण्याची ही तळमळ आहे." असं म्हणत बंटी शेळके यांचं कौतुक होतंय. तर दुसरीकडे उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनीही बंटी शेळके यांना मोठ्या मनाने शुभेच्छा दिल्या आहेत.
विदर्भात कुणाची हवा?
Winning Candidate in Vidarbha:नुकताच आयएएनएसचा एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधून महाराष्ट्रात कुणाचे किती उमेदवार येतील याचा सविस्तर अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार महायुतीला विदर्भात 62 जागांपैकी 32-37 जागा आणि 48 टक्के मतं मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर 62 जागांपैकी 21-26 जागा आणि 39 टक्के मतं ही महाविकास आघाडीला मिळू शकतात असा अंदाज आहे.
ADVERTISEMENT