Eknath Shinde : "...तेव्हा ईव्हीएम घोटाळा", उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा

मुंबई तक

• 02:02 PM • 08 Dec 2024

Eknath Shinde On Sharad Pawar: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप केला आहे. शरद पवार यांनीही मतदानाच्या आकडेवारीत तफावत असल्याचं सांगत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

Eknath Shinde On Sharad Pawar

Eknath Shinde On Sharad Pawar

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

point

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांवर साधला निशाणा

point

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde On Sharad Pawar: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप केला आहे. शरद पवार यांनीही मतदानाच्या आकडेवारीत तफावत असल्याचं सांगत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय. पवारांवर निशाणा साधत शिंदे म्हणाले, "खरं म्हणजे यापूर्वीच झारखंडमध्येही मतदान झालं. कर्नाटकमध्येही झालं. लोकसभेत झालं. प्रियांका गांधीही जिंकल्या आहेत. जेव्हा आपण हरतो, तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं. जेव्हा आपण जिंकतो, तेव्हा ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही. हा दुटप्पीपणा आहे. विरोधी पक्षाकडे आता कोणताही मुद्दा राहिला नाही.

हे वाचलं का?

मी म्हणालो होतो, विरोधी पक्षाला या देशाची जनता चारी मुंड्या चीत करेल. आमच्या लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ, या राज्यातील सर्व घटकांनी विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली. घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत. फिल्डवर उतरून काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात. हे या निवडणुकीने दाखवून दिलं आहे".

हे ही वाचा >>Rahul Narvekar : राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, उपाध्यक्ष कोण?

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "लोकसभेची आकडेवारी आपण पाहिली तर, महायुतीला 2 कोटी 48 लाख 12 हजार 627 मतं आहेत.  म्हणजे 43.55 टक्के मतदान झालं. आम्हाला 17 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख..म्हणजे 2 लाखाचा फरक आहे. आम्हाला 43.55 टक्के मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला 43.71 टक्के मतं मिळाली. म्हणजे पॉईंट 15-16 चा फरक आहे. या पॉईंटमुळे आम्हाला 17 जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. मग हा ईव्हीएम घोटाळा झाला का? तेव्हा त्यांनी ईव्हीएमबद्दल कोणताही आक्षेप घेतला नाही. पवार साहेब म्हणाले, शिवसेनेला 79 लाख मतं मिळाली आणि 57 जागा मिळाल्या. काँग्रेसला 80 लाख मतं मिळाली आणि त्यांना 16 जागा मिळाल्या".

हे ही वाचा >> Latur Waqf Board Notice : लातूरमध्ये 100 हून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फचा दावा? काय आहे खळबळजनक प्रकरण?

"कारण काँग्रेसने जवळपास 100 पेक्षा जास्त जागा लढवल्या. आम्ही 80 जागा लढवल्या. आम्ही कमी जागा लढवल्या आणि त्यांनी जास्त जागा लढवल्या. हे प्रत्येक मतदारसंघाप्रमाणे वेगवेगळं गणित आहे. आमच्या आठ-दहा जागा हजार बाराशे मतांनी आम्ही हरलोय. त्या निवडून आल्या असत्या तर आमच्या 70 जागा झाल्या असत्या. लोकसभेत शिवसेनेला 73 लाख 67 हजार 674 मतं मिळाली. एनसीपीला 58 लाख 51 हजार 166 मतं मिळाली. पण आम्हाला मिळाली 73 लाख आणि एनसीपीला मिळाली 58 लाख..आम्हाला मिळाल्या 7 जागा आणि एनसीपीला मिळाल्या 8 जागा. तिथे ईव्हीएम घोटाळा झाला का? असाही माझा सवाल आहे. तुम्हाला जेव्हा विजय मिळतो, तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात. त्यावेळी ईव्हीएम चांगला असतो. जेव्हा पराभव होतो, तेव्हा ईव्हीएम खराब असतो".

 

    follow whatsapp