Ajit Pawar Vs Eknath Shinde : 'मी तर शपथ घेणार, त्यांचं काही...' अजितदादांचा टोला, शिंदे म्हणाले; 'दादांना सकाळी-संध्याकाळ...'

राजभवनात सत्तास्थापनेचा दावा करण्यात आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बऱ्याच दिवसांनंतर अत्यंत खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं.

Mumbai Tak

सुधीर काकडे

04 Dec 2024 (अपडेटेड: 04 Dec 2024, 04:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महायुतीच्या नेत्यांची पत्रकार परिषद

point

अजितदादा-शिंदेंची तुफान फटकेबाजी

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असून, आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून यावर शिक्कामोर्तब झालं आहे. विधान भवनात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाली. त्यानंतर महायुतीचे सर्व नेते राजभवनावर गेले. यावेळी सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना समर्थनाचं पत्रही राज्यपालांकडे सुपूर्द केलं. यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी दोन्ही नेत्यांचे आणि सर्व आमदारांचे आभार मानले. या पत्रकार परिषदेत शिंदे आणि अजित पवार यांच्यातले टोले टोमणे चर्चेचं कारण ठरले. 

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >>Devendra Fadnavis : मध्यप्रदेश, राजस्थानचा फॉर्म्युला महाराष्ट्रात का नाही चालला? फडणवीस पुन्हा येण्याची 10 कारणं

 

एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे यांना तुम्ही तुम्ही आणि अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का असा सवाल करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ते आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल असं सांगितलं. शिंदेंचं बोलणं सुरू असतानाच अजित पवार म्हणाले, "त्यांचं संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल, पण मी तर उद्या शपथ घेणार आहे." त्यावर एकनाथ शिंदे यांनीही परत टोला मारला. "अजितदादांना तर सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा अनुभव आहे" असं म्हटल्यानं एकच हशा पिकला. 
 

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : सगळ्यांच्या मनातल्या सगळ्याच गोष्टी पूर्ण करता येत नाही... पहिल्याच भाषणात काय म्हणाले फडणवीस?

 

एकूणच, महायुतीच्या या पत्रकार परिषदेतलं हे खेळीमेळीचं वातावरण पाहून अनेक दिवसांनंतर नाराजीच्या चर्चांना काही अंशी पूर्णविराम मिळाल्याचं म्हटलं जातंय. देवेंद्र फडणवीस उद्या महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गटनेते म्हणून निवड झाली. यांच्या नावाला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. आता 5 डिसेंबर म्हणजे उद्या संध्याकाळी 5.30 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी ते शपथ घेणार आहेत. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, धक्कातंत्रातून नवा चेहरा देण्याच्या चर्चांना आता ब्रेक लागला आहे.

 

    follow whatsapp