Gadchiroli Vidhan Sabha Election : भाजपसाठी गडचिरोली विधानसभा जिंकणे अवघड? काँग्रेसची स्थिती काय?

भागवत हिरेकर

• 06:27 PM • 16 Jun 2024

Gadchiroli Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भाजपसाठी स्थिती कशी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये भाजपचा विजय झाला होता.

गडचिरोली विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

follow google news

बातम्या हायलाइट

point

गडचिरोली विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

गडचिरोली विधानसभेत काय आहे राजकीय समीकरणे?

point

भाजप आणि काँग्रेससाठी गडचिरोली विधानसभेत काय आहे वातावरण?

Gadchiroli Assembly Constituency election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठा झटका महायुतीला (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस) बसला. त्यामुळे विधान निवडणुकीच्या निकालाबद्दल उत्सुकता आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात काय घडू शकतं, याकडेही लक्ष आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत इथे भाजप वरचढ होती की काँग्रेस हे बघणं महत्त्वाचे ठरते. (In the Lok Sabha election 2024, Congress had get Lead from Gadchiroli Assembly Constituency)

हे वाचलं का?

गडचिरोली विधानसभा मतदारसंघ 2009 चा अपवाद वगळ्यास 1999 पासून भाजपकडे आहे. मागील दोन निवडणुकीत डॉ. देवराव होळी हे या मतदारसंघातून निवडून आले आहेत. यावेळी मात्र, भाजपसाठी गडचिरोली विधानसभेची निवडणूक जड जाऊ शकते. त्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून समोर आलेली आकडेवारी. ही आकडेवारी भाजपची चिंता वाढवणारी आहे. 

2014, 2019 अशा सलग दोन विधानसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. होळी या मतदारसंघातून विजयी झाले. त्यापूर्वी 1999 आणि 2004 मध्ये भाजपचेच अशोक नेते या मतदारसंघाचे आमदार होते. पण, आता असं काय झालंय की, विधानसभेची निवडणूक कठीण जाऊ शकते, तेच जाणून घेऊयात...

लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये कुणाला किती मताधिक्य?

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होती. गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून डॉ. महादेव किरसान हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर भाजपचे अशोक नेते निवडणूक लढवत होते.

हेही वाचा >> शिंदेंचे 17 आमदार 'डेंजर झोन'मध्ये, विधानसभा जिंकणं कठीण? 

भाजप आमदार असलेल्या गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमदेवार किरसान यांना मताधिक्य मिळाले. लोकसभा निवडणुकीत किरसान यांना तब्बल 22 हजार 917 मतांची आघाडी मिळाली. 

लोकसभेला गडचिरोली विधानसभा मतदारसंघात कुणाला किती मते?

गडचिरोली लोकसभा निकालात कुणाला किती मते?
पक्ष उमेदवार मते
भाजप अशोक नेते 90,008
काँग्रेस नामदेव किरसान 1,12,925

2024 च्या लोकसभा निवडणुकीतील हे निकाल भाजपसाठी आणि भाजपच्या उमेदवारांसाठी कसे चिंता वाढवणारे आहेत, हे जाणून घेण्यासाठी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकालावर नजर टाकणे महत्त्वाचे ठरते. 

विधानसभेमध्ये भाजपला किती मिळाले होते मताधिक्य?

भाजपने सलग दुसऱ्यांदा डॉ. देवराव होळी यांना उमेदवारी दिली होती. होळी यांना 97,913 मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या डॉ. चंदा कोडवते यांना 62,572 मते मिळाली होती. म्हणजे भाजपचे आमदार होळी हे 35,341 इतक्या मताधिक्याने विजयी झाले होते.

आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाल्याचे समोर आले. भाजपच्या उमेदवारापेक्षा काँग्रेसच्या उमेदवाराला 22 हजाराहून अधिक मते मिळाली.

हेही वाचा >> विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी 'एवढ्या' जागा जिंकतील? यादीच पाहा! 

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव जास्त होता. त्यावेळी वंचितच्या गोपाळ मगरे यांना 6,735 इतकी मते मिळाली होती. पण, 2024 च्या लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी जास्त परिणाम करू शकली नाही, त्याचा फायदाही महाविकास आघाडीला झाल्याचे दिसेल.

एक महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रात आणि राज्यातही महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे सत्ताविरोधी नाराजी लोकसभा निवडणुकीत दिसली. विधानसभेतही हाच कल राहिला तर भाजपला गडचिरोली विधानसभा जिंकणे कठीण असेल, असेच दिसत आहे. 

    follow whatsapp