खोक्या, हरीण, लॉरेन्स ते खून... सुरेश धस यांनी केलेला 'तो' खळबळजनक दावा नेमका काय?

Suresh Dhas: आपल्याला मारून टाकण्याचा कट रचला गेला होता, असा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी केला आहे. खोक्याच्या प्रकरणावेळी मला अडकवण्याचा प्लॅन होता असं धस म्हणाले आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

01 Apr 2025 (अपडेटेड: 01 Apr 2025, 02:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माझ्या खुनाचा कट रचला होत : सुरेश धस

point

सुरेश धस यांनी केला खळबळजनक आरोप

point

सुरेश धस यांनी सांगितलेला तो 'मित्र' कोण?

Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून रोज काहीतरी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या संपूर्ण प्रकरणाशी संबंधीत अनेक धक्कादायक गोष्टी महाराष्ट्रानं पाहिल्या आहेत. अशातच आता, सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> कळंबमधील 'त्या' महिलेचा मृतदेह सापडला, पुरावा संपवला? एकाला अटक, संतोष देशमुख प्रकरणाशी कनेक्शन?

आपल्याला मारून टाकण्याचा कट रचला गेला होता, असा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी केला आहे. खोक्याच्या प्रकरणावेळी मला अडकवण्याचा प्लॅन होता असं धस म्हणाले आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस म्हणाले, हरणाचं मांस खोक्याच्या माध्यमातून पुरवला जात असल्याचा आरोप केला गेला होता. त्यावर सुरेश धस यांनी आपली बाजू मांडली. आपल्याला मारण्यासाठी किती मोठा कट रचला गेला होता हे त्यांनी यावेळी सांगितलं. 

सुरेश धस यांचा दावा काय? 

हे ही वाचा >> Kunal Kamra : मुंबई पोलीस 'त्या' घरी पोहोचले, कुणाल कामरा म्हणाला, "मी 10 वर्षांपासून..."

सुरेश धसला हरणाचं मांस खोक्याने पुरवलं... माझ्यावर एवढी वाईट वेळ आली का? मी आयुष्यात 16 वर्ष मी माळकरी राहिलेला माणूस आहे. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी ते करतो पण एवढं हरणाचं वगैरे खाण्यापर्यंत गेलो नाही. पण ते स्टेटमेंट करायचं आणि बिश्नोई समाजाचे लोक तिकिटं काढून आणायचे. म्हणजे मला बिश्नोई समाजात व्हिलन करायचं. त्या समाजात हरणाला देवासमान मानतात. मग तो दुसरा लॉरेन्स बिश्नोई... त्याच्यापर्यंत असं न्यायचं की सुरेश धस हरणाची शिकार करतो. म्हणजे त्या लॉरेन्स बिश्नोईने माझा खून करायचा. इथपर्यंत तुम्ही जात असाल, तर तुमच्यासोबतची दोस्ती काय कामाची. मी हे राज्याच्या मुख्यमंत्र्‍यांना सांगणार आहे. विमानाचं तिकीट काढून आणले होते लोक. जीवनातून उठवण्यापर्यंत गेले ना तुम्ही... कोण कोण गेलेत ते मला माहिती आहे. 

    follow whatsapp