2024 Maharashtra Assembly Election Full Schedule: Voting Dates, Constituency Wise Details and Results: नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आज (15 ऑक्टोबर) तारखेची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा केली. ज्यानुसार महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागेल. (maharashtra assembly election 2024 full schedule voting dates results dates announced constituency key details all you need to know)
ADVERTISEMENT
असा असेल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
- विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 22 ते 29 ऑक्टोबरदरम्यान अर्ज दाखल करता येणार आहेत.
Maharashtra Election 2024: निवडणूक अर्ज छाननीची तारीख
- ज्यानंतर अर्जाची छाननी होईल आणि त्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर आहे.
Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
- तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 4 नोव्हेंबर आहे. तोपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात.
Maharashtra Election: निकालाची तारीख
- विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.
हे ही वाचा>> Mumbai Assembly Election 2024 Full Schedule: महाराष्ट्राचा महासंग्राम... मुंबई-कोकणात 'या' तारखेला होणार मतदान
महाराष्ट्रात किती मतदारसंघात आहेत राखीव?
- महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी SC साठी 29 आणि ST साठी 25 मतदारसंघ राखीव आहेत.
Maharashtra Election Voters: महाराष्ट्रात एकूण किती मतदार?
- महाराष्ट्रात एकूण नोंदणीकृत मतदारांची संख्या 9 कोटी 63 लाख आहे. त्यातील पुरुष मतदार 4 कोटी 97 लाख, महिला मतदार 4 कोटी 66 लाख, नवतरुण मतदार 1 कोटी 85 लाख तर, पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार 20 लाख 63 हजार आहे.
Nanded Lok Sabha by-election: नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही जाहीर
मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. झारखंडमधील 81 आणि महाराष्ट्रातील 288 जागांसाठी मतदान होणार आहे. त्याबरोबरच नांदेडमध्ये पोटनिवडणुका होणार असल्याचंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलं आहे. काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाणांचं यांचं निधन झाल्याने नांदेडमध्ये आता पोटनिवडणूक होणार आहे.
गेल्यावेळी 21 सप्टेबरला विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. यंदा विधानसभा निवडणूकांची तारिख उशीरा झालेल्या असल्या तरी नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील ही आजवरची सर्वात रोमांचक अशी निवडणूक ठरणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष हे या निवडणुकीकडे लागून राहिलं आहे.
Mumbai Election 2024 Schedule | Pune Election Schedule 2024 | West Maharashtra Election Schedules 2024
Marathwada Election 2024 Schedule | Vidarbha Election Schedule 2024 | Maharashtra Election Live Updates
ADVERTISEMENT