Maharashtra Election 2024: कोण कुठे आणि किती जागा जिंकणार, संपूर्ण यादीच आली समोर: सर्व्हे

रोहित गोळे

11 Nov 2024 (अपडेटेड: 11 Nov 2024, 10:23 PM)

Maharashtra Election 2024 Matrize Survey: २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील विविध विभागात कोणाला किती जागा मिळतील याचा अंदाज सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे.

कोण कुठे आणि किती जागा जिंकणार, संपूर्ण यादीच आली समोर: सर्व्हे

कोण कुठे आणि किती जागा जिंकणार, संपूर्ण यादीच आली समोर: सर्व्हे

follow google news

बातम्या हायलाइट

point

महायुती की महाविकास आघाडी कोणाचं सरकार होणार स्थापन?

point

Matrize च्या सर्व्हेतून नेमकं काय आलं समोर?

point

कोणत्या विभागात कोणाला किती जागा मिळणार?

Maharashtra Assembly Election Matrize Survey 2024: मुंबई: महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी Matrize चा सर्व्हे समोर आला आहे. ज्यामद्ये महाराष्ट्रातील सत्ता आणि महायुती-महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार हे देखील समोर आलं आहे. सर्वेक्षणात प्रदेशनिहाय किती जागा कोणाला मिळणार? हे देखील आता समोर आलं आहे. (maharashtra assembly election 2024 matrize survey who will win in maharashtra how many seats will mva and mahayuti get in different regions big claim in this survey)

हे वाचलं का?

मेटेरिझच्या सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (SP) यांना धक्का बसणार आहे. सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांपैकी महायुती आघाडीला 145-165 जागा मिळतील, तर विरोधी पक्ष MVA ला 106-126 जागा मिळतील असा अंदाज आहे.

हे ही वाचा>> VIDEO: रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ, नेटकरी म्हणाले, "हा माज बरा नव्हे..."

कोणाला किती टक्के मते मिळणार?

मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास सत्ताधारी महायुती आघाडी विरोधकांवर मात करण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला 47 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आघाडीला 41 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात, इतरांना 12% मते मिळतील असा अंदाज आहे.

विभागनिहाय किती जागा कोणाला मिळणार?

मेटेरिझने विभागनिहाय सर्वेक्षण केलं आहे. पाहा महाराष्ट्रातील कोणत्या विभागात कोणाला किती जागा मिळू शकतात.  

1. पश्चिम महाराष्ट्र:  

  • महायुती - 70 जागांपैकी महायुतीला 31-38 जागा आणि 48 टक्के मते मिळू शकतील.
  • महाविकास आघाडी - MVA ला 70 जागांपैकी 29-32 जागा आणि पश्चिम महाराष्ट्रात 40 टक्के मते मिळतील असा अंदाज

2. विदर्भ:  

  • महायुती - महायुतीला विदर्भात 62 जागांपैकी 32-37 जागा आणि 48 टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. 
  • महाविकास आघाडी - विदर्भात 62 जागांपैकी 21-26 जागा आणि  39 टक्के मतं ही महाविकास आघाडीला मिळू शकतात.

3. मराठवाडा: 

  • महायुती - 46 जागांपैकी 18-24 जागा. मराठवाड्यात 47 टक्के मते महायुतीला मिळतील असा अंदाज 
  • महाविकास आघाडी - मराठवाड्यातील 46 जागांपैकी 20-24 जागा आणि 44 टक्के मते मिळतील असा सर्व्हेमध्ये अंदाज

4. ठाणे-कोकण:

  • महायुती - ठाणे-कोकण विभागातील 39 जागांपैकी 23-25 आणि 52 टक्केवारी मते महायुतीला मिळू शकतात.
  • महाविकास आघाडी - ठाणे-कोकण विभागातील 39 पैकी 10-11 जागा आणि 32 टक्के मते महाविकास आघाडीला मिळू शकतात.

5. मुंबई:

  • महायुती - मुंबईला 36 जागांपैकी 21-26 जागा मिळतील आणि 47 टक्के मते मिळतील, असं सर्व्हेमध्ये म्हटलंय.
  • महाविकास आघाडी - 36 जागांपैकी 10-13 जागा आणि मुंबईत 41 टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

6. उत्तर महाराष्ट्र:

  • महायुती - उत्तर महाराष्ट्रातील 35 जागांपैकी 14-16 जागा महायुतीला मिळतील असं अंदाज वर्तविण्यात आला आहे.
  • महाविकास आघाडी - उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 जागांपैकी 16-19 जागा आणि 47 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा>> Ajit Pawar: 'मी यावेळेस मुख्यमंत्रीपदाच्या भानगडीतच...', अजितदादांनी उडवून दिली खळबळ

सर्व्हेचा सॅम्पल साइज किती?

10 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान मॅटेराइजचे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नमुन्याच्या आकाराबद्दल सांगायचे तर, सर्वेक्षणात राज्यातील 1,09,628 लोकांची मते घेण्यात आली आहेत. यामध्ये 57 हजारांहून अधिक पुरुष, 28 हजार महिला आणि 24 हजार तरुणांच्या मतांचा समावेश आहे.

    follow whatsapp