Uddhav Thackeray: 'मोदीजी तुमच्यावर काय संस्कार?, तुम्ही माँ आणि बाळासाहेबांचा...', ठाकरे बरसले!

रोहित गोळे

13 Nov 2024 (अपडेटेड: 13 Nov 2024, 06:49 PM)

Maharashtra assembly election 2024: कणकवलीतील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जहरी टीका केली. पाहा नेमकं काय म्हणाले.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

point

'नकली संतान बोलून मोदींनी बाळासाहेब आणि माँचा अपमान केला'

point

मोदीजी संस्कार तरी काय आहेत तुमच्यावर? ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray vs PM Modi: कणकवली: शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज (13 नोव्हेंबर) कोकणात सभा पार पडत आहेत. याचवेळी उद्धव ठाकरेंनी कणकवलीतील सभेत राणेंसह पंतप्रधान मोदींवरच थेट टीका केली आहे. नकली संतान बोलून पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब आणि माँचा अपमान केला हे तुमचे संस्कार का? असं म्हणत ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. (maharashtra assembly election 2024 modiji what are your sanskars you insulted maa and balasaheb uddhav  thackeray criticized)

हे वाचलं का?

पाहा कणकवलीत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले...

'तुम्हाला शिवसेनाप्रमुखांची घराणेशाही नाही चालणार त्यांच्यातील फोडून सगळे गद्दार आम्ही घेऊ. पण शिवसेनाप्रमुखांचा मुलगा नाही चालणार.. वो तो नकली संतान है... एवढी मजल गेली तुमची? तुम्ही बाळासाहेबांचा, माझ्या 'माँ'चा अपमान करता.. काय मोदीजी संस्कार तरी काय आहेत तुमच्यावर?' असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर जहरी टीका केली.

हे ही वाचा>> Vidhansabha Election 2024: 'मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेक लोक...', राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य!

'नकली बोलेल तो बेअकली', अमित शाहांवरही टीकेची झोड

'आज आपण आपल्या आयुष्याची लढाई लढतो आहोत. मघाशी वैभवच्या घरी असताना टीव्ही लावला होता. ते दुसरे महाशय नकली सेना म्हणणारे बेअकली.. कोण अमित शाह.. ये नकली सेना है.. मी मागेच बोललो होतो जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली बोलेल तो बेअकली आहे. मग ते अमित शाह असतील.. तुम्ही बोललात तर तुम्ही बेअकली..' 

'तर त्यांनी सांगितलं की, विकासाला स्थगिती दिली होती, आपण विकास होऊ देत नव्हतो. अच्छा.. अमितभाई विकासाची व्याख्या काय? मी स्थगिती कशाला दिली होती? माझ्या महाराष्ट्राचा विकास गुजरातला न्यायला मी स्थगिती दिली होती. यापुढे तर मी बंदीच घालीन त्यावर.. माझ्या महाराष्ट्राचे उद्योग.. अगदी पाणबुडीचा उद्योग तुम्ही घेऊन गेलात.' असं म्हणत ठाकरेंनी अमित शाहांचा देखील खरपूस समाचार घेतला.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

'मला असं वाटलं होतं की, पंतप्रधान मोदी लोकसभेच्या आधी येत होते तर वाटलेलं की, कोकणाला काही तरी भरघोस देऊन जातील. पॅकेज द्यायचं तर सोडाच पण हे प्रकल्प घेऊन गेले आणि आपल्या अशुभ हाताने भ्रष्टाचारामध्ये पैसा खाऊन पुतळा उभारण्यात सुद्धा भ्रष्टाचार करणारी ही अवलाद.. पुतळा उभारला आपली मतं घेण्यासाठी..'

हे ही वाचा>> Raj Thackeray: "उद्धव ठाकरे आजारी असताना रुग्णालयात गाडी घेऊन जाणारा मीच...", राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

'काही तर प्रमाणात तुम्ही त्यांना भुलला असाल की, मोदींनी महाराजांचा पुतळा उभारला आता आणखी काय पाहिजे.. मोदी म्हणजे काय शिवाजी महाराजांचे भक्तच.. 8 महिन्यात यांचा जो काही आव होता तो कोसळून पडला.'

'छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा म्हणजे आमचा आत्मा आहे.. आमचा देव आहे तो.. आठ महिन्यात पुतळा पडतो आणि आपले मिंधे दाढी खाजवत सांगतात की, वारा एवढा होता की, तो पुतळा कोसळला.. लाज वाटली पाहिजे.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर घणाघाती टीका केली.

 

    follow whatsapp