Maharashtra Vidhan Sabha Survey : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाली सुरू आहे. या सर्व धामधुमीमध्ये सगळेच पक्ष प्रचारामध्ये मोठ्या ताकदीने उतरले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी महाराष्ट्रातली पहिली विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीला राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला होता. मात्र त्यानंतर राज्यात महायुतीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांमुळे महायुतीने मतांचा मोठा टक्का आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळ आता विधानसभा निवडणुकीत कुणाला प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Nawab Malik : निवडणुकीच्या तोंडावर मलिकांना धक्का, 'या' गोष्टीवर आक्षेप घेत ईडीकडून न्यायालयात याचिका
राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबरला निराल लागणार आहे. त्यामुळे निकालासाठी अवघे 10 दिवस बाकी आहेत. मात्र त्यापूर्वीच आता वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेच्या माध्यमातून निवडणुकीचा अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. द महाराष्ट्र अॅनालिटीकाने केलेल्या एका सर्व्हेच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यात कुणाला किती जागा मिळणार हे थेट आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊ.
1. कोल्हापूर
एकूण जागा : 10
महायुती : 02
मविआ : 07
2. सोलापूर
एकूण जागा : 11
महायुती : 02
मविआ : 08
इतर : 01
3. सांगली
एकूण जागा : 08
महायुती : 02
मविआ : 06
इतर : 00
4. पुणे
एकूण : 21
महायुती : 07
मविआ : 14
इतर : 00
हे ही वाचा >>Prakash Ambedkar : ...तर अजित पवारांनी आमच्यासोबत यावं, प्रकाश आंबेडकरांनी का दिली ऑफर?
5. धाराशिव
एकूण जागा : 04
महायुती : 00
मविआ : 04
इतर : 00
6. अहमदनगर
एकूण जागा : 12
महायुती : 03
मविआ : 09
इतर : 00
7. सातारा
एकूण जागा : 08
महायुती : 05
मविआ : 03
इतर : 00
8. बीड
एकूण जागा : 06
महायुती : 02
मविआ : 04
इतर : 00
9. जालना
एकूण जागा : 00
महायुती : 00
मविआ : 05
इतर : 00
10. लातूर
एकूण जागा : 06
महायुती : 03
मविआ : 03
इतर : 00
राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये झालेल्या या सर्व्हेमधून विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळण्याचे चिन्ह आहेत. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल अशा शक्यता आहेत. महाविकास आघाडीच्या एकूण 70 जागांवर 48 मतदारसंघांमध्ये मविआच्या विजयाच्या शक्यता आहेत. तर महायुतीच्या 20 उमेदवारांचा विजय होतील असा अंदाज आहे. तर उरलेल्या 3 जागांवर अपक्ष बाजी मारतील.
दरम्यान, आणखी एका सर्व्हेमध्ये काहीशी वेगळी आकडेवारी समोर आली आहे. मेटेरिझ या संस्थेने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाची विभागनिहाय मांडणी केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या विभागात कोणाला किती जागा मिळू शकतात. आकडेवारीतून जाणून घेऊ.
IANS मेटेरिझ सर्व्हे
1. पश्चिम महाराष्ट्र:
- महायुती - 70 जागांपैकी महायुतीला 31-38 जागा आणि 48 टक्के मते मिळू शकतील.
- महाविकास आघाडी - MVA ला 70 जागांपैकी 29-32 जागा आणि पश्चिम महाराष्ट्रात 40 टक्के मते मिळतील असा अंदाज
2. विदर्भ:
- महायुती - महायुतीला विदर्भात 62 जागांपैकी 32-37 जागा आणि 48 टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
- महाविकास आघाडी - विदर्भात 62 जागांपैकी 21-26 जागा आणि 39 टक्के मतं ही महाविकास आघाडीला मिळू शकतात.
3. मराठवाडा:
- महायुती - 46 जागांपैकी 18-24 जागा. मराठवाड्यात 47 टक्के मते महायुतीला मिळतील असा अंदाज
- महाविकास आघाडी - मराठवाड्यातील 46 जागांपैकी 20-24 जागा आणि 44 टक्के मते मिळतील असा सर्व्हेमध्ये अंदाज
4. ठाणे-कोकण:
- महायुती - ठाणे-कोकण विभागातील 39 जागांपैकी 23-25 आणि 52 टक्केवारी मते महायुतीला मिळू शकतात.
- महाविकास आघाडी - ठाणे-कोकण विभागातील 39 पैकी 10-11 जागा आणि 32 टक्के मते महाविकास आघाडीला मिळू शकतात.
5. मुंबई:
- महायुती - मुंबईला 36 जागांपैकी 21-26 जागा मिळतील आणि 47 टक्के मते मिळतील, असं सर्व्हेमध्ये म्हटलंय.
- महाविकास आघाडी - 36 जागांपैकी 10-13 जागा आणि मुंबईत 41 टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
6. उत्तर महाराष्ट्र:
- महायुती - उत्तर महाराष्ट्रातील 35 जागांपैकी 14-16 जागा महायुतीला मिळतील असं अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- महाविकास आघाडी - उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 जागांपैकी 16-19 जागा आणि 47 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT