Vidhansabha Election 2024: मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्याच पाठीत खंजीर खुपसला: प्रियंका गांधी

रोहित गोळे

16 Nov 2024 (अपडेटेड: 16 Nov 2024, 08:26 PM)

Priyanka Gandhi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्याच पाठीत खंजीर खुपसला.' असं म्हणत प्रियंका गांधींनी खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला.

'मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्याच पाठीत खंजीर खुपसला'

'मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्याच पाठीत खंजीर खुपसला'

follow google news

बातम्या हायलाइट

point

'मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्याच पाठीत खंजीर खुपसला'

point

प्रियंका गांधींचा खळबळजनक आरोप

point

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका

कोल्हापूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. अशातच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज (16 नोव्हेंबर) कोल्हापूरमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एक गंभीर आरोप केला आहे. (maharashtra vidhansabha election 2024 modi stabbed balasaheb thackeray son uddhav thackeray in the back priyanka gandhi criticizes narendra modi)

हे वाचलं का?

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्याच पाठीत खंजीर खुपसला.' असं म्हणत प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. 

पाहा कोल्हापूरच्या सभेत प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्या.

'पंतप्रधान मोदींची मी जी भाषणं ऐकतेय ती भाषणं निराश करणारी भाषणं आहेत. कारण की, त्यात सच्चेपणा दिसून येत नाही. असं वाटतंय की, बोलतायेत एक आणि करतायेत काही वेगळं. महाराष्ट्राच्या या भूमीचा अपमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचाही अपमान होतोय. कारण जी त्यांची तत्वं आहेत तीही मोडली जात आहे. दुसरीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा बनला तो कोसळला. त्यात एवढा भ्रष्टाचार होता.'

'पंतप्रधान मोदी हा मंचावर येतात तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात.. एकीकडे बाळासाहेबांविषयी बोलतात आणि त्यांच्याच मुलाचा पाठीत यानी खंजीर खुपसला.'

हे ही वाचा>> Priyanka Gandhi: "महिलांनो सतर्क व्हा,1500 रुपयात...", लाडकी बहीण योजनेवरून प्रियांका गांधींनी केलं मोठं आवाहन

'शेतकऱ्यांसाठी यांनी 10 वर्षात नेमकं काय केलं? कोणत्या तोंडाने हे शेतकऱ्यांबाबत बोलत आहेत?' 

'निवडणुकीच्या चार महिन्याआधी या लोकांनी महिलांसाठी एक योजना आणली. 1500 रुपये प्रत्येक महिन्याला देणार म्हणे.. अरे पण आतापर्यंत काय करत होते? आता महागाई एवढी वाढली आहे की अटोक्यातच येईनाशी झाली आहे. एका कुटुंबातील कितीही लोकं कामं करत असली तरी महागाईच्या बोज्याखाली संपूर्ण कुटुंब दबलं जातंय.' 

'मोदीजी तुमच्यासमोर मंचावर येतात आणि निवडणुकीसाठी एक योजना आणतात. ते विचार करत आहेत की, 4 महिन्यात 1500 रुपये देऊन ते आपली मतं मिळवतील?'

हे ही वाचा>> CM Eknath Shinde: "काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री...", शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

'अरे यांनी आतापर्यंत तुमच्याकडून किती गोष्टी यांनी घेतल्या आहेत. छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही अधिकचा पैसा मोजावा लागत आहे.' 

'इथल्या लोकांना रोजगार मिळत नाहीए. 2.50 पदं अजूनही रिक्त आहेत. ही लोकं काय करत आहेत तर.. जे मोठे उद्योग आहेत, कंपन्या आहेत ते महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात नेत आहेत. ही आहे यांची मेहनत.. सगळं आपल्या उद्योगपती मित्रांना देऊन टाका.' 

'अदाणींना सगळं द्या, बंदरं, रस्ते, विमानतळं, धारावी... सगळं त्यांनाच द्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हटलं की, म्हणतात पैसे नाही. पण उद्योजकांचे 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं जातं. पण तुमच्यासाठी पैसा नाही.' असं प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.  

    follow whatsapp