Dadar Mahim Constituency : माहिम मतदारसंघात यंदा विधानसभेची लढत चांगलीच तापलेली आहे. अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत अशा या लढतीकडे सध्या मुंबई आणि राज्याचं लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात झालेल्या प्रचार सभा पाहता, सर्वच नेत्यांच्या टीकेची धार वाढत चालली आहे. मात्र अशातच आता सदा सरवणकर यांच्या लेकीच्या भाषणाची चांगलीच चर्चा होतेय. सदा सरवणकर यांची लेक प्रिया सरवणर यांनी या भाषणात अमित ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. (sada sarvankar daughter priya sarvankar targets amit thackeray mns candidate)
ADVERTISEMENT
अमित ठाकरे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरल्यानंतर या मतदारसंघातलं गणित बदललं. सदा सरवणकर हे या मतदारसंघा आमदार आहेत, त्यामुळे महायुतीच्या जवळ असलेल्या राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी मिळाल्यानं सरवणकर यांची गोची होणार की काय असं चित्र होंत. मात्र सरवणकर हे आता चांलगेच दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. माहिमध्ये झालेल्या अशाच एका प्रचार सभेतील सदा सरवणकर यांच्या लेकीच्या भाषणाची आता चांगलीच चर्चा होतेय.
हे ही वाचा >>Sharad पवार थेट म्हणाले, 'गद्दाराला शिक्षा.. वळसे-पाटलांना 100 टक्के पराभूत करा'
मनसेने आपला एका नवा सिनेमा रिलीज केला, परवा इथे त्या सिनेमाचं प्रमोशन सुरू होतं. नवीन फ्रेश चेहरा? अहो काय सिनेमा काढताय का? एखाद्या सिनेमासाठी ठीक आहे, पण इथे गल्लीतल्या पाच समस्या माहिती आहे का? कुणाला हवाय का तो चेहरा? एक नेता म्हटलं तर त्यांचं कतृत्व, वकृत्व आणि नेतृत्व असावं लागतं. आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का? असा सवाल करत प्रिया सरवणकर यांनी थेट अमित ठाकरेंवर निशाणा साधला.
"एका युवराजाला निवडून दिल्याचा वरळीकरांना पश्चाताप"
पुढे बोलताना प्रिया सरवणकर म्हणाल्या, की शुन्यातून विश्व निर्माण करायला मी माझ्या वडिलांकडे बघून शिकले. एक मिल कामगार काय करुन शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना प्रिया सरवणकर म्हणाल्या की, एका युवराजाला वरळीमध्ये निवडून देऊन लोकांना पश्चाताप झाला, या राजपुत्राला तुम्ही मत द्याल का? लोकांना राजा नकोय, लोकांना सेवक हवाय असं म्हणत प्रिया सरवणकर यांनी थेट अमित ठाकरेंवर निशाणा साधला. महिलांचा अपमान केला जातोय. आम्ही कूकर वाटले म्हणता पण आम्ही दिवाळीत पणत्या वाटतो, हळदी-कुंकू वाटतो तेव्हा निवडणूक नसते असं म्हणत प्रिया सरवण यांनी केलेल्या कामांचीही आठवण करुन दिली.
महेश सावंत यांची थेट मिमिक्री करत प्रिया सरवणकर यांनी निशाणा साधला. काँग्रेससोबत जाताना मान खाली घालून गेलो होतो म्हणता, पण आता त्यात काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. प्रत्येक निवडणुकीला समोरच्या पक्षाकडून काय घेतलं, तो कसा पडला हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत महेश सावंत यांच्यावर प्रिया सरवणकरांनी निशाणा साधला.
ADVERTISEMENT