Rashmi Shukla Mumbai : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक काळात पदावर ठेवू नये अशी मागणी होतेय, मात्र त्यावर निवडणूक आयोग हा विषय आमच्या अधिकारात येत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. याचवेळी त्यांनी झारखंडच्या पोलीस महासंचालकांची कशी बदली केली हे देखील सांगितलं. राज्यातील पोलीस दबावात काम करतायत, आमच्या कार्यकर्त्यांवर तडीपारी, मकोका लावून निवडणूक हातात घेण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे राज्यात पारदर्शक निवडणुका घ्यायच्या असेल तर रश्मी शुक्ला यांना हटवावंच लागेल असं राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
रश्मी शुक्ला यांचा इतिहास पाहिल्यास, २०१९ साली सरकार बनवताना फडणवीसांना मदत करा अशा धमक्या रश्मी शुक्ला यांनी दिल्या होत्या. त्या आमचे फोन ऐकत होत्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्या निलंबित झाल्या, पण फडणवीस येताच त्यांना पदावर घेतलं, या निष्पक्ष कशा असतील? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसंच नाना पटोले यांनी केलेली मागणी योग्य असल्याचं राऊत म्हणाले.
हे ही वाचा >>Arvind Sawant : 'माल' शब्द वापरणं भोवणार? शिवसेना महिला आघाडी अरविंद सावंतांविरोधात थेट....
राज्यातील निवडणूक अशा स्थितीत खऱ्या अर्थाने निष्पक्ष होतील का याचा निवडणूक आयोगाने विचार केला पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जातायत. यांचा दबाव पोलिसांवर आहे असं राऊत म्हणाले. रश्मी शुक्ला यांच्या पाठिशी कोण आहे? असा सवाल केला असता संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं. यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे असं राऊत म्हणाले.
अजूनही आमचे फोन टॅप होतात : राऊत
हे ही वाचा >>Trumpet Symbol : पवारांसाठी गुड न्यूज! ‘तुतारी’ चिन्हाबाबत निवडणूक आयोग प्रचंड मोठा निर्णय!
आमचे फोन अजूनही टॅप होत आहेत, त्यांचे लोक ऐकत आहेत. आजही अनेक विधानसभेतल्या पोलीस खात्यावर एकतर्फी काम करण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्याकडून दबाव आहे असा आरोप राऊत यांनी केला. तसंच आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन तडीपार करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
ADVERTISEMENT