उद्धव ठाकरे हे सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वादळी दौरा करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे त्यातच आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने वणी तालुक्यातील हेलिपॅडवर उतरले. यावेळी उद्धव ठाकरे हेलिपॅडवर उतरले असता, त्यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Riteish Deshmukh : धर्म वाचवा म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात... रितेश देशमुख तुफान बरसले, भाषणाची चर्चा
उद्धव ठाकरे यांची बॅग तपासयला आलेल्या अधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. स्वत: व्हिडीओ घेताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना अनेक सवाल केले. "आतापर्यंत कुणाकुणाची बॅग तपासली? उद्या देवेंद्र फडणवीस, मोदी, शाह, मिंधे आलेत तर त्यांची बॅग तपासणार का? ते आल्यावर त्यांची बॅग तपासल्याचा व्हिडीओ मला पाठवायचा, तिकडे शेपूट नाही घालायची. ठीके तपासा माझी बॅग, माझा युरिन पॉटही तपासा" असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अधिकाऱ्यांनी बॅग उघडायला सुरू केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "काय उघडायचं ते उघडा, नंतर मी उघडतो तुम्हाला." उद्धव ठाकरे यांनी पाण्याचा बॉक्स तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना "काही पाणी वगैरे पाहिजे असेल तर घ्या, तुम्हीही माणसं आहात" असं म्हणत टोला मारला. पुढे ते म्हणाले, फ्युएल टँकही तपासा. तसंच ही सर्व तपासणी शूट करणाऱ्या कॅमेरामॅनला नाव विचारला असता, कॅमेरामनने नाव सांगून आपण मध्यप्रदेशचा रहिवासी असल्याचं सांगितलं. त्यावरही उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही गुजरातचे नाही ना... मध्यप्रदेशचे... म्हणजे आता बॅग तपासायलाही बाहेरच्या राज्यातले लोक आहे असं म्हणत संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT