बिग बॉस सिझन 16 सुरु होतोय. या सीझनमध्ये कोणते सेलिब्रेटी स्पर्धेत भाग घेणार आहेत, याची उत्सुकता चाहत्यांना आहेच. पण त्याचबरोबर नेहमीप्रमाणे सलमान खानच्या बाबतीत वेगवेगळ्या बातम्या येत असतात. सलमान खान आता बिग बॉस शो होस्ट करणार नाही, अशा बातम्या दरवर्षी येत असतात. त्यात सलमान खान प्रत्येक सिझनसाठी किती मानधन घेतो, याची देखील नेहमी चर्चा होते. मात्र आपल्या मानधनाबद्दल आणि शो होस्टिंग सोडण्याबद्दल स्वतः सलमाननेच खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
1 ऑक्टोबरपासून बिग बॉस हा शो सुरु होतोय. त्यापूर्वी सलमानने पत्रकार परिषद बोलावली होती. यादरम्यान त्याने अनेक प्रश्नांचे उत्तरे दिली. सलमानने गेल्या सिझनला आपलं मानधन तीनपट वाढवून 350 कोटी केलं होतं. त्यानुसार, हिशोब करायचा झाला तर सीजन 16 साठी सलमान खान 1000 कोटींहून अधिकची मागणी करत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती. यावर स्वतः सलमाननेच खुलासा केला आहे.
मानधनाबद्दल सलमान खान काय म्हणतो?
बिग बॉस सिझन 7 ची विजेता गोहर खान हिने सलमानला प्रश्न विचारला की, सलमान खानला 1 हजार कोटी मानधन यंदा मिळणार आहे, अशा अफवा आहेत. यावर मजेशीर अंदाजात सलमान म्हणाला , ‘एवढे पैसे मिळाले तर मी कधीच काम करणार नाही. पण लवकरचं तितकं मानधन मिळेल. आणि मिळाले तरी माझा खर्च खूप आहे. जसं की वकील. अशा अफवांमुळे आयकर विभाग, ईडीचे लोक नोटीस करतात आणि ते येतात मग त्यांना खरं काय ते कळतं. नंतर सलमान म्हणाला, माझी फी इतकी नाही. माझी फी या रकमेच्या 1/4 सुद्धा नाही. असं उत्तर देत सलमान खानने 1000 कोटी फी घेतल्याच्या फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे.
शो सोडण्याबाबत काय म्हणाला सलमान?
यासह अनेक प्रश्नांची उत्तरे सलमानने दिली. सलमानला गोहर म्हणाली की, सध्या इंडस्ट्रीमध्ये अनेकांचे लग्न झालेत. त्यापैकी कोणत्या जोडप्याला तू बिग बॉसच्या घरात पाठवू इच्छितो? यावर सलमान म्हणाला कोणीच नाही, कोणीही घरात जाण्यासाठी इच्छुक नसेल, असं मला वाटत नाही. त्याउलट अशा लोकांना मी घरात पाठवू इच्छितो जे जातील एकटे आणि बाहेर जोडीने येतील, असं सलमान म्हणाला. शो सोडण्याबाबत प्रश्न विचारला असता सलमान म्हणतो, शोच्या लोकांकडे काही पर्याय उरलेला नाही, म्हणून ते मला निवडतात. नाहीतर मला त्यांनी काय मी स्वतः मला निवडलं नसतं, असं गमतीत सलमान म्हणाला.
ADVERTISEMENT