Maharashtra Lock down : बीड, नांदेड, परभणीत पुन्हा कडक निर्बंध लागू

मुंबई तक

• 08:04 AM • 24 Mar 2021

बीड: कोरोनाची दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या पाहता बीड जिल्ह्यात उद्यापासून (25 मार्च) रात्री 12 वाजेपासून ते 4 एप्रिलपर्यंत कठोक लॉकडाऊन असणार आहे. या काळात शासकीय कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये, आस्थापनं बंद राहतील. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटिजेंन टेस्ट किंवा आरटीपीसीआर बंधनकारक असेल असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. आज (24 मार्च) […]

Mumbaitak
follow google news

बीड: कोरोनाची दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या पाहता बीड जिल्ह्यात उद्यापासून (25 मार्च) रात्री 12 वाजेपासून ते 4 एप्रिलपर्यंत कठोक लॉकडाऊन असणार आहे. या काळात शासकीय कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये, आस्थापनं बंद राहतील. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटिजेंन टेस्ट किंवा आरटीपीसीआर बंधनकारक असेल असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. आज (24 मार्च) बीड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली आहे. (10 days strict lockdown in beed district from march 26)

हे वाचलं का?

काय-काय बंद असणार?

  • बीड जिल्ह्यातील स्टेडियम, जिम, स्विमिंग पूल, उपहारगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, बंद राहणार आहेत.

  • शाळा महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था देखील या काळात बंद असतील.

  • सार्वजनिक, खाजगी वाहने, दुचाकी, चारचाकी वाहनांना बंदी असेल.

  • याशिवाय सर्व प्रकारची बांधकामे, चित्रपट गृहे, व्यायामशाळा, नाट्यगृह बंद असतील.

  • मंगल कार्यालय, हॉल, स्वागत समारंभ होणार नाहीत.

  • सर्व धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळं बंद असतील.

  • खाजगी कार्यालये बंद असतील.

अभिनेता आमिर खानलाही झाली कोरोनाची लागण

काय-काय सुरू राहणार?

  • सर्व किराणा दुकानं सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.

  • किरकोळ विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 या वेळेत दुकानातून घरपोच किराणा माल पुरवठा करता येईल.

  • दूध विक्री सकाळी 10 पर्यंत सुरू राहील.

  • भाजीपाला व फळांची विक्री सकाळी 7 ते 10 या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना विक्री करता येईल.

  • दुकानाचे शटर बंद करून आत क्लोजिंगची कामे तीन व्यक्तींना करण्यास परवानगी असेल.

  • हे किरकोळ विक्रेते सकाळी 7 ते 12 या काळात गल्लोगल्ली फिरून विक्री करतील.

  • खाजगी दवाखाने मेडिकल सुरू राहतील.

  • ऑनलाइन औषध वितरण दवाखान्याशी संलग्न असलेली दुकाने 24 तास सुरू ठेवता येतील.

  • स्वस्थ धान्य दुकाने दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहतील.

  • सर्व न्यायालये, राज्य, केंद्र शासनाची कार्यालये 50 टक्के उपस्थितीमध्ये सुरू ठेवता येतील.

  • पोलीस पेट्रोल पंप, साई पेट्रोल पंप हे दोन पंप सुरू राहतील.

  • येथे पोलीस व इतर शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी, घरगुती गॅस, पिण्याच्या पाण्याचे वितरण करणारी वाहने यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरता येणार आहे.

  • दैनिक वर्तमानपत्र, नियतकालिके, डिजिटल प्रिंट मीडिया, शासकीय कार्यालये सुरू राहतील.

  • अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी असेल.

दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून महाष्ट्रातल्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाढत असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या महाराष्ट्र सरकारच्या चिंतेत भर पाडत आहे. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर नांदेड आणि परभणीमध्येही जिल्हा प्रशासनातर्फे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नांदेडमध्ये लॉकडाउन तर परभणीत ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहेत

नांदेडमध्ये १५ मार्चपासून शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, बाजार सुरु झाल्यामुळे गर्दी वाढत होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंधांची घोषणा केली. परंतू लोकांकडून या नियमांचं पालन न झाल्यामुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ व्हायला लागली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटंनकर यांनी २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. या काळात जिल्ह्यातील टू व्हिलर, फोर व्हिलर, सिटी बस आणि अन्य वाहनं बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या मेडीकल, हॉस्पिटल व इतर सेवांना या काळात दुकानं सुरु ठेवण्याची परवानवगी मिळाली आहे.

याशिवाय, परभणीतही बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं, औषधं दुकानं, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या काळात प्रवासाची सूट मिळाली आहे. याव्यतिरीक्त किराणा मालाची दुकानं, दुध विक्री केंद्र यांना सकाळी सहा ते नऊ या काळात विक्रीची परवानगी मिळाली आहे. एका ठिकाणी थांबून विक्रेत्यांना आपल्या मालाची विक्री करता येणार नाहीये.

    follow whatsapp