नायलॉन मांजाने (nylon string) पतंग उडवण्याच्या कुणाच्या तरी हौसेने एका चिमुकल्याचा जीव घेतला. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना घडलीये महाराष्ट्राच्या (maharashtra) उपराजधानीत अर्थात नागपूरमध्ये (nagpur)!
ADVERTISEMENT
पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा मांजा वापरू नका असं सतत सांगितलं जातं असलं तरी अनेकजण याचा वापर करताना दिसत आहेत. असंच कुणाच्यातरी नायलॉन मांजामुळे एका 11 वर्षाच्या चिमुकल्याला जीव गमावावा लागला. ऐन मकरसंक्रातीच्या दिवशी वेदच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला.
वेद शनिवारी (14 जानेवारी) सायंकाळी त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवरन जात होता. अचानक मांजा आला व त्याचा गळा कापला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला लगेच मानकापूर येथील इस्पितळात नेण्यात आले.
वेदवर तेथे उपचार झालेच नाही. अखेर रात्री धंतोलीतील खाजगी दवाखान्यात त्याला दाखल करण्यात आले. नायलॉन मांजामुळे झालेली जखम गंभीर होती आणि त्यातच उपचार मिळायला उशीर झाला.
शनिवारपासून दबा धरून बसलेल्या काळाने ऐन मकर संक्रातीच्या दिवशी वेदवर झडप घातली. वडिलांसोबत हसत हसत घराबाहेर पडलेल्या वेदचा निष्प्राण देहच घरी आला. वेदच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात केला.
ADVERTISEMENT