महाराष्ट्रात दिवसभरात 14 हजार 732 रूग्णांना आज दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 56 लाख 54 हजार 3 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा 95.55 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात 8 हजार 129 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज दिवसभरात 200 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
ADVERTISEMENT
आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 82 लाख 15 हजार 492 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59 लाख 17 हजार 121 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला महाराष्ट्रात 1 लाख 47 हजार 354 सक्रिय केसेस आहेत.
महाराष्ट्रातले कोरोना मृत्यू लपवले जाताहेत का?
आज नोंद झालेल्या 200 मृत्यूंपैकी 132 मृत्यू हे मागील 48 तासातले आहेत. तर 68 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधले 1392 मृत्यू हे उशिरा नोंदवण्यात आले आहेत त्यामुळे मृत रूग्णांच्या संख्येत भर पडली आहे. हे मृत्यू पुणे 253, अहमदनगर 222, नाशिक 141, नांदेड 133, सातारा 103, लातूर 80, नागपूर 75, अकोला-67, सांगली- 65, ठाणे 43, धुळे 39, नंदुरबार 35, रत्नागिरी 20, वर्धा 20, जळगाव 19, यवतमाळ 18, परभणी 12, बीड 10, हिंगोली 7, कोल्हापूर 7, सोलापूर 6, रायगड 5, उस्मानाबाद 4, पालघर 3, औरंगाबाद 1, बुलढाणा 1, जालना 1, सिंधुदुर्ग 1 आणि वाशिम 1 असे आहेत.
10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेले जिल्हे
मुंबई – 18205
ठाणे- 15686
पुणे- 19047
सांगली- 10077
कोल्हापूर- 15156
महाराष्ट्रातल्या पाच शहरांमध्ये अद्यापही 10 हजारांपेक्षा जास्त रूग्ण सक्रिय आहेत. कोल्हापुरातही पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. त्यामुळे आजच अजित पवार आणि राजेश टोपे यांनी कोल्हापूरचा दौरा केला. कोल्हापूरमधले निर्बंध शिथील केले जाणार नाहीत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT