राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्याला निघण्यापूर्वी 150 ब्राह्मणांकडून पुण्यात पूजापाठ

मुंबई तक

29 Apr 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:50 AM)

1 मे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. या सभेला जाण्याआधी राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले, जिकडे त्यांचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. पुण्याहून राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने रवाना होतील, त्याआधी त्यांच्या निवासस्थानाबाहेर 150 ब्राह्मणांकडून पूजापाठ करुन राज ठाकरेंना आशिर्वाद देण्यात येईल असं मनसेने जाहीर […]

Mumbaitak
follow google news

1 मे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. या सभेला जाण्याआधी राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले, जिकडे त्यांचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. पुण्याहून राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने रवाना होतील, त्याआधी त्यांच्या निवासस्थानाबाहेर 150 ब्राह्मणांकडून पूजापाठ करुन राज ठाकरेंना आशिर्वाद देण्यात येईल असं मनसेने जाहीर केलं आहे.

हे वाचलं का?

राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. औरंगाबाद पोलिसांनी राज यांच्या सभेसाठी 16 अटी आणि नियम घालून दिले आहेत. पुण्यावरुन औरंगाबादला निघताना मनसेकडून जोरदार शक्तीपदर्शन करण्यात येणार आहे. राज ठाकरे सकाळी 8-9 वाजल्याच्या दरम्यान आपल्या प्रवासाला सुरुवात करतील. त्याआधी राज ठाकरेंच्या घरी पूजापाठ करायला 150 ब्राह्मण गुरुजी उपस्थित असतील अशी माहिती मनसे नेते अजय शिंदे यांनी दिली.

स्वतःच्या आणि पक्षाच्या अस्तित्वाची काळजी घ्या – बाळासाहेब थोरातांना चंद्रकांत पाटलांचा टोला

राज ठाकरे यांच्या ताफ्यासोबत मनसे कार्यकर्त्यांच्या 500 गाड्या औरंगाबादला जाणार आहेत. 1 मे च्या सभेसाठी मनसे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. आपल्या औरंगाबाद प्रवासादरम्यान राज ठाकरे पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या वढू गावाजवळ थांबून छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर श्रद्धांजली वाहून पुढे रवाना होतील.

    follow whatsapp